आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola, Buldhana District, Which Supports The Infestation Of Bollworm In September, Call For Measures Due To The Increase In Infestation.

बोंडअळीचा सप्टेंबर महिन्यात वाढणार प्रादुर्भाव:अकोला, बुलढाणा जिल्ह्यात आक्रमण वाढल्याने उपाययोजनांचे आवाहन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील विविध भागात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या संकटाने शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे केले आहे. सप्टेंबर महिना हा या किडीच्या वाढीसाठी पोषक असल्याने वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्या, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या चमूने काही भागातील कपाशी पिकांची पाहणी केली आहे. प्रारंभी अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट व बार्शीटाकळी तालुक्याती काही ठिकाणी बोंडअळीचे अवशेष मिळून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिनिंग प्रेसिंग असलेल्या भागात तसेच शेजारील शेतात जास्त प्रादूर्भाव आढळून आला आहे.

त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव, मोताळा, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. वर्धा व यवतमाळ भागातही प्रादूर्भावाची प्रकरणे आहेत. काही ठिकाणी प्रादूर्भावाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याने वेळीच सावध होण्याची गरज आहे. असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

बोंडअळी रोखण्यासाठी..

  1. पीक 90 दिवसाचे होईपर्यंत दर आठवड्यात सर्वेक्षण करा. डोकमळ्या वेचून नष्ट करा.
  2. एकरी दोन फेरोमोन सापडे लावा. अडकलेले पतंग दर आठवड्याने नष्ट करा.
  3. ट्रायकोकार्ड कपाशी पिकामध्ये लावावे.
  4. सापळ्यात पतंग अडकण्यास सुरुवात झाल्याबरोबर 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

खबरदारी आवश्यक

कीड रोगाच्या प्रादूर्भावामुळे पश्चिम विदर्भात कीटकनाशक फवारणीची कामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. दरम्यान, दरवर्षी विदर्भात कीटकनाशक फवारणीतून विषबाधेची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे फवारणी करताना सुरक्षात्मक खबरदारी घ्यावी, लहान मुलांकडून फवारणीची कामे करून घेऊ नये. सुरक्षा साधनांचा वापर करून रसायने हाताळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

वेळीच करा उपाययोजना

ज्या ठिकाणी 15 ते 20 दिवसांचे बोंड तयार झाले. ते बोंडअळीचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे सप्टेंबर महिना हा गुलाबी बोंडअळीच्या किडीसाठी पोषक वातावरणाचा असल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करुन किडीचा बंदोबस्त करता येतो. तर ऑक्टोंबर महिन्यातील कापूस गुलाबी बोंडअळीमुक्त असू शकतो.- डॉ. धनराज उंदिरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग

बातम्या आणखी आहेत...