आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीटाकळीत भीषण आग:तासात बिअर बार जळून खाक; आग विझविताना 2 सिलिंडरचा स्फोट, चालकाचे मोठे नुकसान

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शीटाकळी शहरातील एका बिअर बारला पहाटे ५ वाजता भीषण आग लागली. यामध्ये बिअर बार पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मुख्य म्हणजे अग्निशमन दलाने आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले. त्यामुळे खालच्या मजल्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची वास्तू बचावली. सिलिंडरच्या स्फोटातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बार्शीटाकळी मुख्य चौकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँकेच्या वरती पंकज बिअर बार आहे. रात्री कर्मचारी काम आटोपून घरी गेले. सकाळी पाच वाजता बारमधून आगीचे लोड बाहेर पडत होते. आगीचे रूप प्रचंड रौद्र होते. त्यामुळे परिसरातमध्ये काही वेळ नागरिकांची धावपड उडाली. सहा वाजता अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. जवळपास दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग विझविताना दोन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविताना जवानांना मोठी कसरत करावी लागली.

बँकेची इमारत बचावली

बिअरबारवरच्या मजल्यावर आहे. तर खाली बँकेची वास्तू आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्यामुळे बँकेपर्यंत आग पोहचली नाही. अन्यथा नुकसानीचा आकडा मोठा असता. मात्र, भीषण आगीमध्ये बिअर बारचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...