आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे येथे झालेल्या ८ वी मुले, मुली राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. स्पर्धेत केंद्राला १८ पदक प्राप्त झाले, यात पाच सूवर्ण पदकासह केंद्राला सामूहिक उपवजिेता पदक प्राप्त झाले.
सुवर्णपदक वजिेता बॉक्सर समीक्षा सोळंके, आदिती कठाणे, सुनिधी बोराडे, भक्ती वाघमारे ठरल्या. रजत पदक वजिेता बॉक्सर प्रेशिक गजभिये, ओम टाकळे, मोईन खान, यश मेश्राम ठरले. कांस्य पदक वजिेता ३४ किलो वेदिका तायडे, ३६ किलो प्राची वाहुरवाघ, निशा पाठक, विेदिता भूतडा, स्मिता राजपूत, आदित्य तायडे, शवरिाज देशमुख, रजत गायकवाड, मंथन हवरिाळे यांनी पदक प्राप्त केले. खेळाडूंसोबत प्रशिक्षक म्हणून गजानन कबीर, शुभम चौधरी, रोहन मडके, विशाल नुषे, वंदना पिंपळखरे, अक्षय टेभूर्निंकर, विशाल सुनरविाल उपस्थित होते. सर्व खेळाडू स्व. वसंत देसाई स्टेडियम क्रीडा प्रबोधनीत राज्य प्रशिक्षक सतिशचंद्र भट व सहाय्यक प्रशिक्षण शाकीर पठाण यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत. सर्व वजिेत्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी अभनिंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.