आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला सामान्य नागरिकांना निसर्ग, प्राणी यांच्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी बुद्ध पौणिर्मेला वन विभागाकडून निसर्ग अनुभव उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात मचाणावरून हा अनुभव घेण्यासाठी वन्यप्रेमी आतुर असतात.
मात्र, यंदा निसर्ग अनुभव उपक्रमावर पावसाचे संकट आहे. तसेच जंगलातील अंतर्गत पाण्याचे स्त्रोत अवकाळी पावसामुळे भरले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जंगलाच्या बाहेरील आवारात प्राण्याचे दर्शन दुर्लभ होणार आहे.
पावसाचा जोर कायम
अकोला वन विभागांतर्गत काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य, कारंजा सोहळ वन्यजीव अभयारण्य, तसेच बुलडाणा ज्ञानगंगा, लोणार, बोथा येथील परिसरात मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी मचाणांची संख्या कमी आहे. यामुळे कमी लोकांना या निसर्ग अनुभवाचा आनंद घेता येणार आहे. त्यात पावसामुळेही व्यत्यय निर्माण होतो आहे.
मागील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. अशात पौर्णिमेच्या रात्री पावसाची किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पावसाचे वातावरण राहिल्यास चंद्र निघणार नाही. ढगाळ वातावरणात प्राणी दर्शन शक्य नाही. तसेच सध्या वादळी पाऊस पडतो आहे. अशात रात्रभर मचाणावर काढणे अवघड ठरणार आहे.
जागा कमी; वन्यप्रेमींमध्ये नाराजी
यावर्षी सामान्य नागरिकांचा कोटा कमी करण्यात आला आहे. परिणामी फार कमी लोकांना निसर्ग अनुभव उपक्रमात सहभागी होता येणार आहे. याशिवाय काही ठिकाणी मचाण उभारण्यात आलेल्या नाहीत. याबद्दल वन्यप्रेमिंकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
प्राण्याचे दर्शन विरळ
कधी नव्हे मे महिन्यात जोरदार पाऊस होत आहे. मे महिन्यात सर्वसाधारणत: जंगलातील स्त्रोत कमी होतात. पशू-पक्षी पाण्याच्या शोधात भटकंती करतात. पानगळीमुळे दूरवर सायटींग शक्य होते. मात्र, यंदा परिस्थिती पू्र्णत: भिन्न आहे. यामुळे प्राण्यांचे सायटींग कमी होऊ शकते. प्राणी-गणनेमध्ये सहभागी होणाऱ्यांनी पावसाची योग्य खबरदारी घ्यावी. बचावासाठी आवश्यक साहित्य सोबत ठेवावे. - गोविंद पांडे, वन्यजीव अभ्यासक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.