आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 80 घरांचे बांधकाम मोजण्याचे आयुक्तांचे आदेश:प्रत्येक झोनमध्ये सुरु असलेल्या अवैध बांधकामाची केली जाणार पाहणी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही झोन मध्ये दररोज प्रत्येकी 20 घरांचे बांधकाम मोजण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी दिले आहेत.

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतुने आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी विविध उपाय योजना आखत आहे. यापूर्वी हार्डशिप आणि कंपाऊंडीग योजना, गुंठेवारीचे नियमानुकुल ऑफ लाईन पद्धतीने तसेच 400 रुपयात अवैध नळजोडणी वैध करणे आदी उपाय योजना सुरु केल्या आहेत.

या मालमत्तांच्या बांधकामाची मोजणी

आता पुन्हा शहरात चारही झोन मध्ये जी बांधकामे सुरु आहेत. त्यांचे बांधकाम नियमानुसार होत आहे की नाही? याची तपासणी करण्यासाठी पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोन मध्ये नव्याने सुरु असलेले बांधकाम तसेच नव्याने तयार झालेले आणि मंजुर नकाशापेक्षा अधिक बांधकाम असलेल्या मालमत्तांच्या बांधकामाची मोजणी करण्याचे आदेश दिले आहे.

प्रत्येक झोन मध्ये दररोज 20 मालमत्तांचे बांधकाम मोजण्याचे आदेश दिले आहेत. चारही झोन मध्ये प्रत्येकी 20 यानुसार दररोज 80 तर एका महिन्यात 2 हजार 400 बांधकामाची मोजणी पूर्ण करण्याची ताकिद आयुक्तांनी दिली आहे. यासाठी प्रत्येक झोन मधील एक अभियंता अतिक्रमण विभागाचे चंद्रशेखर इंगळे यांच्या पथकात देण्यात आले आहेत. मोजणीचे काम नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचे कर्मचारी करणार आहेत.

रस्ते मोकळे राहावे

या कामास शुक्रवारी 3 फेब्रुवारी पासून प्रारंभ केला जाणार आहे. तसेच सोमवारी 6 फेब्रुवारीपासून अतिक्रमण हटाव मोहिम नव्याने आखली जाणार आहे. यात आयुक्तांनी रस्ते नेहमीसाठी मोकळे राहावे, अशा सुचना अतिक्रमण हटाव पथकाला दिल्या आहेत.

पथकाचा खर्च वसुल झाला पाहिजे

या अनुषंगाने आयुक्तांनी घेतलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बैठकीत अवैध बांधकाम असल्यास बांधकाम पाडण्याचा खर्च संबंधित मालमत्ता धारकाकडून वसुल करावा. जेणेकरुन पथकात नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांचे वेतन आणि कंत्राटदाराचा खर्च यातून निघायला हवा, अशी ताकिदही आयुक्तांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...