आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी प्रकरणाचे पडसाद सोमवारी अकाेल्यातही उमटले असून, अदानी समुहातील गैरकारभाराची चाैकशी करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) मुख्य शाखेसमाेर धरणे आंदोलन सुरू झाले आहे. अदानी समूहाच्या प्रकरणाची चौकशी व्हायलाच पाहिजे, सामान्यांचा पैसा सुरक्षित राहिलाच पाहिजे , या घोषणा देण्यात येत आहेत.
देशाने 70 वर्षात कमावलेली संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मित्र अदानी यांना देण्याचा सपाटा लावलेला आहे, असा आराेप काँग्रेसने केला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून एसबीआय व भारतीय आयुर्विमा मंडळमध्ये (एलआयसी) गुंतविलेले हजारो कोटी रुपये अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आले आहे. गैरकारभारामुळे हजारो कोटी रुपये बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.
मात्र त्यानंंतरही केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. त्यामुळे अदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी, 6 फेब्रुवारी राेजी काँग्रेसतर्फे एसबीआय बँकेसमोर धरणे आंदोनाला सुरुवात झाली आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या आवाराबाहेर धरणे आंदोलनासाठी मंडप टाकण्यात आला आहे. या आंदोलनात आंदोलनात महानरागध्यक्ष डाॅ. प्रशांत वानखडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर. प्रकाश तायडे, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष पूजा काळे, माजी नगरसेवक साजिद खान पठाण, डॉक्टर झिशान हुसेन, प्रदीप वखारिया ,महेंद्र गवई, डॉक्टर सुभाष कोरपे ,निखिलेश दिवेकर, विजय देशमुख, आकाश कवडे, जगदीश मुरूमकार आदी सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारवर टीका
काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही पण सर्व नियम, कायदे मोडून एखाद्या उद्योगपतीसाठी रान मोकळे करणे हे देशाच्या हिताचे नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. खा. राहुल गांधी यांनी सातत्याने अदानीसंदर्भात धोक्याची जाणीव करुन दिली होती. महिनाभरापूर्वीच राहुलजी यांनी अदानीचा फुगा फुटेल ,असे सांगितले होते तरीही मोदी सरकार जागे झाले नाही, आता घोटाळा उघड झाला आहे. काँग्रेस पक्षासह विरोधपक्ष या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहेत मात्र मोदी सरकार चौकशीही करत नाही व काही उत्तरही देत नाही, अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.