आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola Corona Outbreak Updates: An Average Of One Positive Every Two Minutes; The Death Of A Coward In Two Hours; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविड सुसाट:दर दोन मिनिटात सरासरी एक पॉझिटिव्ह; दोन तासात एका कोविडबाधितांचा मृत्यू

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकाच दिवसात 10 कोरोनाबाधितांचा बळी; 708 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुसाट वेगात पसरत असून दर दोन मिनिटाला एक रुग्ण आढळत असून, दोन तासात एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब स्पष्ट होत आहे. बुधवारी ७५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर गुरुवारी, २२ एप्रिलला पुन्हा दिवसभरात ७०८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे दोन दिवसात तब्बल १ हजार ४६२ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय सलग दोन दिवस १७ आणि १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दर दोन तासात एका रुग्णाचा बळी जात असल्याचे निदर्शनास येते. गुरुवारी दिवसभरात ७०८ रुग्ण आढळल्याने आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांचा आकडा ३६१४५ वर पोहोचला आहे. १२७ जणांना डिस्चार्ज झाल्याने एकूण डिस्चार्ज २९३७३ झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यःस्थितीत ६१७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वयोगट ४१ ते ५० मध्ये १५ बळी
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ५० वर्षाच्या आतील मृतांचा आकडा एप्रिलमध्ये वाढला असून या वयोगटातील अनेक रुग्ण हे गंभीर अवस्थेत दाखल होत आहेत. यामध्ये दुर्धर आजारांनी ग्रस्त असणार्‍यांचे प्रमाणही अधिक असल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे.

रोज सरासरी ६ मृत्यू
एप्रिलच्या सुरुवातीपासून वाढलेली मृत्यूची संख्या आटोक्यात येताना दिसत नाही. जिल्ह्यात दिवसाला सरासरी सहा ते सात रुग्णांचा उपाचारादरम्यान मृत्यू होत आहे.

४० च्या आतील १२ मृत्यू
एप्रिल महिन्यात ४० वर्षाच्या आतील मृतांची संख्या वाढली असून यामध्ये डाबकी रोड ३५ वर्षीय पुरुष, वाडेगाव ३२ वर्षीय पुरुष, नायगाव ४० वर्षीय महिला, दगडीपारा ३६ वर्षीय पुरुष, विवराचानी २५ वर्षीय महिला, पारस ४० वर्षीय महिला, महान २८ वर्षीय महिला, मोठी उमरी ३९ वर्षीय पुरुष, वाडेगाव २८ वर्षीय महिला, वानखडेनगर ३१ वर्षीय पुरुष, राहुलनगर ३२ वर्षीय पुरुष, वस्तापूर ता. अकोट येथील ३२ वर्षीय पुरुष अशा १२ रुग्णांचा मृत्यू झाला.

या दिवशी सर्वाधिक बळी
तारीख मृत्यू
१७ एप्रिल १०
१३ एप्रिल १२
२१ एप्रिल १७

प्रयोगशाळेतून ५४६ पॉझिटिव्ह
जीएमसी प्रयोगशाळेतून प्राप्त ५४६ पॉझिटिव्ह अहवालात मूर्तिजापूर-७९, अकोट-१४, बाळापूर-सात, तेल्हारा-१४, बार्शी टाकळी-८३, पातूर-९७, अकोला ग्रामीण-५४, अकोला मनपा क्षेत्र-१९८ असे रुग्ण आढळले आहेत. रॅपिडमधून १६२ पॉझिटिव्ह : जिल्ह्यात २४ तासात झालेल्या रॅपिड चाचण्यांमध्ये १६२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यात अकोट येथून पाच, बार्शीटाकळी येथे दोन, पातूर एक, तेल्हारा १२, मूर्तिजापूर येथे १०, अकोला मनपातर्फे १०, अकोला आयएमए येथे चार, जिल्हा आरोग्य कर्मचारी एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५८, हेडगेवार लॅब येथून ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

दिव्य मराठी इम्पॅक्ट
सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वॉर्डात मनुष्यबळाअभावी सेवा पुरवता येत नसतील तर आवश्यक मनुष्यबळाची मागणी करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जीएमसी प्रशासनाला गुरुवारी, २२ एप्रिलला दिले. सर्वोपचार रुग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्न गंभीर असून दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची बाब दिव्य मराठी सातत्याने मांडत आहे. ‘सर्वोपचारमध्ये ४० व्हेंटिलेटर वापराविना, मनुष्यबळाचा प्रश्न’ या शीर्षकाखाली दिव्य मराठीने गुरुवारी वृत्त प्रकाशित करून अतिदक्षता विभागातील गंभीर स्थिती मांडली. यानंतर सायंकाळी पालकमंत्री कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली आणि आढावा घेतला. रुग्णेसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव द्या असे निर्देश त्यांनी जीएमसी प्रशासनाला दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये

बातम्या आणखी आहेत...