आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. शुक्रवारी 1 मे रोजी 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर शनिवारी 2 मे रोजी पुन्हा 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एक खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या 38 वर पोहोचली आहे. त्यातील 22 रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत.
शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या 47 अहवालांमध्ये 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण हा मोहम्मद अली रोड परिसरातील रहिवाशी आहे. तर इतर पाच रुग्णांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या संपर्कात आलेले खाजगी डॉक्टर आणि चार कर्मचार्यांचा समावेश आहे. मयत महिला शासकीय रुग्णालयात येण्याआधी खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. दरम्यान, 1 मे रोजी दाखल झालेल्या एका 79 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला आहे. 1 मे रोजी आढळलेल्या चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका मृत रुग्णाचा समावेश असून संबंधित रुग्णास मृतावस्थेत 28 एप्रिलला रुग्णालयात आणले होते. 1 मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा 56 वर्षीय व्यक्ती खैर महम्मद प्लॉट या भागातील रहिवासी असून तो फळ विक्रेता होता. अन्य एक रुग्ण 79 वर्षीय पुरुष असून तो रामदास पेठेतील टिळक पार्क जवळ राहणारा आहे. तर एक 66 वर्षीय महिला व 39 वर्षीय पुरुष हे दोघे या आधीच्या एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील असून ते कंवरराम सोसायटी येथील रहिवासी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.