आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी चोरी, कुटुंबातील सर्व सदस्य रुग्णालयात भरती असल्याचा घेतला गैरफायदा

अकोला3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी सील केलेल्या परिसरात चोरी झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

अकोल्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरात जबरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. शहरात रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने रुग्णाच्या घरातील सर्व 9 सदस्यांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात भरती केले होते. यादरम्यान बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी रात्री चोरी केली. चोरी झाल्याची बाब सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात आली.  अकोल्यात मंगळवारी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. अकोल्यातील मोहमद अली रोडवरील बैदपुरा भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी तपासणीत स्पष्ट झाले. हा रुग्ण व्यवसायानिमित्त दिल्लीला जाऊन आल्याची माहिती आहे.  दरम्यान, त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबातील 9 सदस्यांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल केले होते. या गोष्टी फायदा घेऊन चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या घराच चोरी केली. रात्री ही चोरी झाल्याची माहिती सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह
सगळीकडे कोरोनाची प्रचंड दहशत असताना चोरट्यांनी थेट कोरोनाग्रस्त रुग्णाच्या घरीच चोरी केल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे, कारण या चोरट्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं हा भाग सील करण्यात आला आहे. तरीही चोरट्यांनी या घरात चोरी करण्याचं धाडस केले. यावरुन आता पोलिस विभाग आणि प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...