आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola | Crime | Love Marrige And Suicide | Marathi News | Refusal To Marry Cousin's Daughter; Attempted Suicide By Poisoning A Youth On The Day Of Saksagandha's Event

युवकाविरुद्ध गुन्हा दाखल:मामाच्या मुलीचा लग्नास नकार; साक्षगंधाचा कार्यक्रमाच्या दिवशी तरुणाचे विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मामाच्या मुलीने लग्नास नकार दिल्याने एका युवकाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आहे. तर दुसरीकडे जिच्यासाठी या तरुणाने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते. त्या मामाच्या मुलीने त्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अकोल्यातील बोरगाव येथे ही घटना असून, तरुणाविरुद्ध बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील धानोरी बुद्रूक येथील युवकाने विष प्राशन केल्यानंतर समोर आले की, तो त्याच्या मामाच्या मुलीवर प्रेम करायचा. मात्र, मामाची मुलीच्या ध्यानीमनी नसल्याने तिने स्पष्ट नकार देत आपले भावाबहिणीचे नाते आहे, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर मामाच्या मुलीची सोयरीक दुसऱ्या युवकासोबत जुळल्याने आणि तिचा साक्षगंधाचा कार्यक्रम ठरल्याने युवकाने विष प्राशन केले.

पोलिस पाटील रामेश्वर नांदेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर मामाच्या मुलीचे आणि त्याचे फोटो युवकाने सोशल माध्यमावर व्हायरल करून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला म्हणून मामाच्या मुलीने बोरगाव मंजू पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यावरून युवकाविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...