आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वडिलाने आईच्या डोक्यात दगड टाकून तिला मारण्याचा प्रयत्न केला. मुलाने रोखण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत तोच दगड वडिलाच्या डोक्याला लागल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी दुपारी कृषीनगरात घडली. किशोर विश्राम पाईकराव वय ४० असे मृतकाचे नाव आहे. तर जितेंद्रकुमार किशोर पाईकराव असे पोलिसांनी अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.
नक्की काय घडले?
या मुलाने नुकतेच वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहे. किशोर विश्राम याला दारूचे व्यसन होते. त्याच्या व्यसनाधीनतेला कंटाळून आणि त्याचा कुटुंबाला कोणताही आधार नसल्याने पत्नी माया किशोर पाईकराव ही मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी येथून आपल्या दोन मुलांना घेऊन अकोल्यातील कृषीनगरमध्ये राहायची. मुलगा जितेंद्रकुमार हा बारावीचे शिक्षण घेत होता. तर दुसरा मुलगा दहावीत शिकत आहे.
आई ही गोयनका होस्टेलमध्ये सहा हजार रूपये महिन्याने काम करायची. त्यात मुलांचे शिक्षण आणि खोलीभाडे असा कुटुंबाचा गाडा ती ओढत होती. त्यातच कधीकधी पती किशोर पाईकराव हा अकोल्याला यायचा आणि दारू पिऊन पत्नी आणि मुलांना मारझोड करीत असे. चार-पाच दिवसांपूर्वी तो पत्नी व मुलांकडे आला होता.
दारू पिऊन मारहाण
बुधवारी दुपारी दारू पिऊन त्याने पत्नी आणि मुलांना मारझोड केली व तो मोठा दगड घेऊन पत्नीच्या मागे लागला. आईच्या डोक्यात वडिल दगड घालणार तोच मुलगा जितेंद्रकुमार याने धावत जावून तो अडवण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत तोच दगड वडिलांच्या डोक्याला लागला. भरदुपारचे ऊन आणि दारू प्यायलेला असल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
वडिलांचा मृत्यू झाल्याचे पाहून घाबरलेल्या मुलाने रक्ताने माखलेल्या दगडावर पाणी टाकले होते. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे ठाणेदार भाऊराव घुगे हे घटनास्थळी पोहाेचले. त्यांनी मुलाला ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी या मुलाविरूद्ध आता बापाच्या मृत्यूप्रकरणी भादंविचे कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गेल्या दहा महिन्यांपूर्वी विनोद वामन टोंबरेंवर (वय ३५, पंचशील नगर, खरप, अकोला) याची हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांडातूनच हे हत्याकांड घडल्याची चर्चा होती.
पती गेला जीवाने तर मुलगाही जेलमध्ये
दारूने पाईकराव कुटुंब उद्धवस्त केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली. दारूच्या नशेत वडिलाने आईला मारझोड करत तिच्यामागे दगड घेऊन लागल्यानेच मुलगा आडवा आला आणि त्याच्या हातून झटापटीत हे कृत्य घडले. सुखाने जगण्यासाठी अकोल्यात आलेल्या आईने पतीलाही गमावले आणि मुलालाही आता डोळ्यादेखत पोलिस घेऊन गेल्याचे पाहण्याची वेळ तिच्यावर आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.