आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola Crime Police Fail To Trace Minor Girlवर्षभरापूर्वी झाले अपहरण; अल्पवयीन‎ मुलीचा शोध घेण्यात पोलिस अपयशी‎, तक्रार मागे घेण्याचा नातेवाईकांचा दबाव

अपहरण:वर्षभरापूर्वी झाले अपहरण; अल्पवयीन‎ मुलीचा शोध घेण्यात पोलिस अपयशी‎, तक्रार मागे घेण्याचा नातेवाईकांचा दबाव

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला‎ मुलगी बेपत्ता होऊन वर्षे झाले, मात्र‎ तिला शोधून काढण्यात पोलिस‎ अपयशी ठरले आहेत. आता माझी‎ मुलगी जिवंत तरी आहे का, असा टाहो‎ मुलीच्या आईने फोडला आहे.‎ खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १२‎ एप्रिल २०२२ रोजी १५ वर्षीय मुलगी रात्री‎ ८ वाजता दुकानात गेली होती ती परत‎ आलीच नाही. परिसरातीलच युवकाने‎ तिचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या‎ आईने पोलिसांत दिली होती.

त्यानुसार‎ आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा‎ दाखल करण्यात आला होता.‎ तेव्हापासून मुलीचा शोध घेण्यात यावा‎ म्हणून मुलीच्या आईने पोलिस‎ अधीक्षक ते महानिरीक्षक,‎ मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदने दिली. मुलीचा‎ शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी‎ वाहतूक कक्षाकडे चौकशी‎ सोपवण्यात आली. मात्र आजपर्यंत या‎ मुलीचा शोध लावला नाही, मुलगी‎ जिवंत आहे की नाही, याबाबतही‎ मुलीचे नातेवाईक चिंतेत आहेत.‎

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव

अशातच त्यांनी दाखल केलेली तक्रार‎ मागे घ्यावी असा दबाव आरोपीचे‎ नातेवाईक अशोक गोपाल शिरसाट,‎ सनी गोपाल शिरसाट, सुरेश शिरसाट,‎ अमर देवीचंद इंगळे, सहालाल,‎ आशाबाई, अनिल मोरे आणत‎ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.‎ दबाव आणणाऱ्यांची नावे पीडित‎ मुलीच्या आईने पोलिसांकडे दिली‎ असताना मुलीचा शोध घेण्यात‎ अडचण कशी येत आहे? हा प्रश्न‎ असून, पोलिसांनी गांभीर्याने आपल्या‎ मुलीचा शोध घ्यावा, अशी आर्त‎ विनवणी मुलीच्या आईने केली आहे.‎