आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला, बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनवर कीड रोग:कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळी; पानांची अक्षरशः झाली चाळणी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या विविध भागात कपाशीच्या पिकांवर गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. आता त्या पाठोपाठ सोयाबीनची पिकेही किड रोगाच्या कचाट्यात सापडत आहे. अनेक भागात ऐन शेंगा भरण्याच्या काळातच सोयाबीनवर कीड रोगाचा हल्ला होत असल्याने पानांची अक्षरश चाळणी झाली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्या चमूने केलेल्या पाहणीत बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकांवर चक्रीभुंगा कीडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्या चमूकडून पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात पिकांची पाहणी करण्यात येत आहे.

विविध जिल्ह्यांत गुलाबी बोंडअळी आढळून आल्यानंतर सोयाबीनवर चक्रीभुंगा आढ‌ळून येत आहे. चक्रीभुंग्याचा प्रादूर्भाव वाढल्यास कीडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आतापासून शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

फवारणी सल्ला

सोयाबीन भरण्याच्या अवस्थेत शेंगपोखरणाऱ्या अळीचा (पोड बोरर) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. नियंत्रणासाठी किटक-विशिष्ट फेरोमोन ट्रॅप (हेलिलुर) वापरणे आणि वरील आर्थिक नुकसानाची पातळीच्या प्रादुर्भावासाठी (3 सुरवंट प्रति मीटर पंक्ती लांबी) इंडॉक्साकार्ब सारख्या शिफारस केलेल्या रसायनांची फवारणी 15.8 टक्के ईसी प्रती 6.7 मी.ली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.

पिवळा मोझॅकचा अटॅक

ज्या भागात पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव आढळून येतो, त्या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यात रोगाचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी 4 ते 5 प्रति एकर पिवळा चिकट सापळा उभारावा. तसेच प्रभावित झाडे काढून टाका आणि नष्ट करावे. पांढऱ्या माशीच्या वरील आर्थिक नुकसानाची पातळीच्या प्रादुर्भावासाठी, स्वच्छ हवामानात बीटा-सायफ्लुथ्रीन 8.49 टक्के + इमिडाक्लोप्रिड 19.81 टक्के ओ.डी प्रती 7 मि.ली किंवा थायामेथोक्सॅम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन प्रती 2.5 मि.ली प्रति 10 लिटर पाण्यात प्री-मिक्स फॉर्म्युलेशनची फवारणी करावे. यामुळे स्टेम फ्लायचे नियंत्रण देखील सुलभ होईल.

खोडकिडीचा प्रादुर्भाव

ज्या भागात खोड कीडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, त्याठिकाणी प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी 4 ते 5 प्रति एकर प्रती पिवळे चिकट सापळे लावावे व व्यवस्थापनासाठी झाडाचे खराब झालेला भाग काढून नष्ट करावा. वरील आर्थिक नुकसानाची पातळीच्या प्रादुर्भावासाठी (सुमारे १० टक्के नुकसान झालेल्या झाडे), क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 टक्के प्रती 3 मि.ली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के ईसी प्रती 6.7 मि.ली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी, असे तज्ज्ञ सांगतात.

बातम्या आणखी आहेत...