आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola Dam 87.26 Percent Of The Water Storage Capacity Is Available In The District | Dispersion From Small Projects To Medium Projects Continues; Happy Atmosphere Among Farmers

जिल्ह्यात साठवण क्षमतेच्या 87.26 टक्के जलसाठा:मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पातून विसर्ग सुरुच; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला सिंचन मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या जिल्ह्यातील जल प्रकल्पाच्या एकुण साठवण क्षमतेच्या 87.23 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर दोन मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्प ओंसडून वाहात आहेत अकोला सिंचन मंडळाच्या अखत्यारीत दोन मोठे, तीन मध्यम आणि 24 लघु प्रकल्प आहेत.

मोठ्या प्रकल्पामुळे 168.30 दललक्ष घनमीटर साठवण क्षमता, मध्यम प्रकल्पांमुळे 81.99 दलघमी तसेच 24 लघु प्रकल्पामुळे 96.72 अशी एकुण 347.01 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता उपलब्ध झाली आहे. मागील तीन ते चार वर्षापासून जोरदार पावसामुळे मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे सतत उघडावे लागले आहेत. तर मध्यम आणि लघु प्रकल्प ओंसडून वाहात आहेत. यावर्षीही हाच अनुभव अकोलेकरांनी घेतला.

अद्यापही विसर्ग सुरू

काटेपूर्णा आणि वान या दोन मोठ्या प्रकल्पात एकुण 141.63 दलघमी, मध्यम प्रकल्पात 81.99 दलघमी तर लघु प्रकल्पात 79.17 दलघमी असा एकुण 302.79 दशलक्ष घनमीटर (87.26 टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. जुलै अखेर पासून आता पर्यंत काटेपूर्णा, वान प्रकल्पाचे दररवाजे सातत्याने उघडावे लागले आहेत. तर मोर्णा, उमा या दोन प्रकल्पाच्या सांडव्यावरुन अद्यापही विसर्ग सुरू आहे. मात्र निर्गुणा प्रकल्पाच्या सांडव्यावरील विसर्ग आता बंद झाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये आनंद

त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात शहरासह विविध गावांना पाणी टंचाईची झळ फारशी पोचण्याची शक्यता नाही तसेच खरीपाच्या हंगामात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र रबी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

प्रकल्पाचे दरवाजे बंद

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 27 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता दोन दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. यातून 50.161 घनमीटर प्रतिसेकंद (50 हजार 160 लीटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र पाण्याची आवक कमी झाल्यामुळे 28 ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजता हा विसर्ग बंद करण्यात आला. मात्र या सात तासाच्या कालावधीत 126 कोटी 40 लाख 32 हजार लिटर पाण्याचा विसर्ग झाला.

प्रकल्प निहाय जलसाठा असा

काटेपूर्णा प्रकल्प - 81.71 दलघमी 94.32 टक्के

वान प्रकल्प - 59.92 दलघमी 73.11 टक्के

मोर्णा प्रकल्प - 41.46 दलघमी - 100 टक्के

निर्गुणा प्रकल्प - 28.85 दलघमी - 100 टक्के

उमा प्रकल्प - 11.68 दलघमी - 100 टक्के

बातम्या आणखी आहेत...