आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola Discharge From 18 Small Projects District And Discharge From Gates Two Projects Warning Settlements Along Banks Rivers And Canals.

नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा:जिल्ह्यातील 18 लघु प्रकल्पाच्या सांडव्यावरुन तर दोन प्रकल्पाच्या दरवाजातून विसर्ग सुरू

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील 24 पैकी 18 लघु प्रकल्पाच्या सांडव्यावरुन तर दोन लघु प्रकल्पाचे प्रत्येकी दोन दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदी-नाल्या काठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारीत जिल्ह्यात 24 लघु प्रकल्प आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस तसेच ऑगस्टच्या प्रारंभी जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील लघु प्रकल्प 100 टक्के भरले असून प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर दोन लघु प्रकल्पाचे प्रत्येकी दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

लघु प्रकल्पाचा फायदा

लघु प्रकल्प 100 टक्के भरल्याने प्रकल्प परिसरातील गावातील सिंचन तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पाचा फायदा अकोला शहरासह तालुक्याच्या गावांना होतो. त्याच प्रमाणे लघु प्रकल्पाचा फायदा ग्रामीण भागातील विविध भागांना होतो. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लघु प्रकल्पाच्या जलसाठ्याकडे लागले असते.

लघु प्रकल्प महत्वाचे

तसेच लघु प्रकल्पाची साठवण क्षमता कमी असल्याने उन्हाळ्यात लघु प्रकल्पातील गाळही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नेता येतो. त्यामुळे एकीकडे जमीन सुपिक आणि दुसरीकडे सिंचन असा दुहेरी फायदा ग्रामस्थांना होतो. त्यामुळे ग्रामीण भागासाठी लघु प्रकल्प महत्वाचे ठरतात. यावर्षी सर्वच लघु प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे.

या प्रकल्पाच्या सांडव्यावरून विसर्ग

बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळगाव हां., पिंपळगाव चां., सावरखेड, इसापूर, जनुना, घोटा, मोझरी, झोडगा, मोऱ्हळ, हातोला, पातूर तालुक्यातील पातूर, गावंडगाव, विश्वामित्री. मूर्तिजापूर तालुक्यातील शिवणखुर्द, वाई. अकोट तालुक्यातील शहारपूर बृहत, शहापूर लपा, या लघु प्रकल्पाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. तर दगड पारवा प्रकल्पाच्या दोन दरवाजातून 8.20 घनमीटर प्रतिसेकंद तर पोपटखेडा टप्पा-2 प्रकल्पाच्या दोन दरवाजातून 2.44 घनमीटर प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अन्य प्रकल्पातील स्थिती

बाळापूर तालुक्यातील कसुरा, तामसी हे कोल्हापूरी बंधारे तर कवठा बॅरेज आहे. पावसाळ्यात या लघु प्रकल्पाचे दरवाजे उघडे ठेवले जातात. पावसाळ्याच्या अखेरीस हे दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे पावसाळ्या नंतर या प्रकल्पात जलसाठा उपलब्ध होतो. तर नया अंदुरा प्रकल्पात 84 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...