आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल:अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

24 वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते व तिचे लैंगिक शोषण केले होते. या प्रकरणी आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.गोगरकर यांनी दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल शुक्रवारी देण्यात आला.

मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथील सोनबा उर्फ सोनू महानुर (२४) असे या नराधम आरोपीचे नाव आहे. पीडीतेचे वडीलांनी माना पोलिस स्टेशन सोनबा उर्फ सोनू महानुर याचेविरुद्ध अज्ञान मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये नराधमाने पळवून नेवून अज्ञान मुलीसोबत पती-पत्नीसारखे राहून एक महिना तिच्यावर अत्याचार केला होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये पीडितेला मोटारसायकलवर सोबत घेवून येत असताना नरधमाला अटक करण्यात आली होती.

पीडीतेला पळून नेण्याच्या दोन दिवस आधी आरोपी सोनबा महानूर हा पीडितेच्या घरी जावून आला होता. तक्रारीवरून पोलिसांनी कलम 363, 366, 504, 506 भा.दं.वि. तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 3, 4, 5, 6 नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करून तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरिता एकूण नऊ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानुन वि. न्यायालयाने सोनबा उर्फ सोनू महानुर याला भा.दं.वि. 376 व 366 अंतर्गत दोषी ठरवून 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व सात हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी एएसआय विल्हेकर व एलपीसी सोनू आडे यांनी सहकार्य केले.