आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरात घूसून महिलेला शरीरसुखाची मागणी केली. महिलेने विरोध केला असता त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.गोगरकर यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
अन्सार शहा सत्तार शहा (२८, रा. मजलापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 28 जुलै 2016 रोजी पीडिता ही घरी एकटी असताना तिच्या घराचा दरवाजा नराधम अन्सारने ठोकला. पीडितेने कोण आहे हे पाहण्याकरिता दरवाजा उघडला असता तो दार ढकलून घरात घुसला व त्याने शरीर सुखाची मागणी केली. तिच्या पोटाला चाकू लावून धाक दाखवत जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने पती कामावरून घरी परत आल्यावर त्यांना सदरहू घटना सांगितली. त्यानंतर पीडितेने बोरगांव मंजू पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 376(i), 450, 452, 354(ए) (iii), 506 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करून तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोप पत्र सादर करण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरिता एकूण सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने अन्सार शहा सत्तार शहा याला भादंवि. 376(i), 354(A) (iii) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय कलम 450, 452 भा.दं.वि. अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व सात हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. कलम 506 भा.दं.वि. अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजाराचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची साधी कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी हे.कॉ. कंडारकर व एलपीसी. सोनू आडे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.