आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना कहर:चार तासातच भरुन निघतोय दिवसभरातील गर्दीचा ‘अनुशेष’; निर्बंध केवळ कागदावर

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्बंधांच्या आदेशाला हरताळ, उदासीन सरकारी यंत्रणा अन बेफिकिर अकोलेकर

काेराेना िवषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कठाेर निर्बंध लागू करण्यात अाले असले तरी ते पाळण्यात येत नसल्याचे काळजी वाढवणारे िचत्र रविवारी शहरात ठिकठिकाणी दिसून अाले. दुध, किराणा, भाजी, फळांच्या िवक्रीसाठी सकाळी ७ ते ११ पर्यंत मुभा देण्यात अाली असली तरी याच चार तासात प्रचंड गर्दी हाेत केवळ जीवनावश्यक साहित्याची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी असतानाही िबगर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू हाेती. बाजारपेठेत मुखपट्टीचा (मास्क) वापर न करणे, िफजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याचे प्रकार दिसले. त्यामुळे महसूल, पाेलिस, मनपा प्रशासन अाहे की नाही, असा प्रश्न पडवा, असेच िचत्र रविवारी २३ मे राेजी िदसून अाले.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी िजल्हाधिकाऱ्यांनी गत अाठवड्यात टाळेबंदी शिथिल करुन काही बाबी अटी-शर्तींसह दुकाने-सेवा सुरू ठेवण्याची मुभा दिली. नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी सकाळी चार तास किराणा, भाजी, फळांची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली. मात्र खरेदीसाठी बाहेर पडताना नागरिक व व्यापारीही नियमांचे पालन करीत नसल्याचे रविवारी िदसून अाले.

अशीही बेिककिरी
जुने शहरात श्रीवास्तव चाैक ते शिवाजी नगर दरम्यान रस्त्यावर भाजी - फळ िवक्रीची दुकाने हाेती. गर्दीमुळे काेराेनाची भीती कुठे आहे? असे वाटत हाेते.

नागरिक इंधनाविनाच गेले परत
खासगी वाहनांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच पेट्राेलपंपावर इंधन मिळत असून, रविवारी १०. ३० वाजतानंतर काही पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची गर्दी हाेती. या वेळी ११पर्यंत रांगेत असलेल्या वाहन चालकांना पेट्राेपंपाच्या अातमध्ये प्रवेश देण्यात अाला. नंतर बॅरीकेटस लावण्यात अाले. त्यामुळे ११ नंतर अालेल्या खासगी वाहन चालकांना िवनाइंधनच परत जावे लागले.

डाॅ. बाबासाहेब अांबेडकर खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकादरम्यान रस्त्यावरच फळ व अन्य साहित्य िवक्रीची दुकाने थाटण्यात अाली हाेती. याच राेडवर कापड, इलेक्ट्राॅनिक्ससह अन्य बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु हाेती.येथे नियमांचे पालन हाेत नसल्याचे िदसून अाले. काही नागरिकांची अशी बेफिकीर वृत्ती अािण सरकारी यंत्रणाच्या उदासीनतेमुळे काेराेनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचा अाराेप हाेत अाहे.

अाम्हाला काेण अडवणार

  • महापालिकेच्या निर्णयानुसार डाॅ. बाबासाहेब अांबेडकर खुले नाट्यवगृह ते फतेहअली चाैक, गांधी चाैक ते ताजनापेठ दरम्यान फळ, भाजांची दुकाने भाटे क्लब मैदानावर सुरू ठेवणे अपेक्षित अाहे. मात्र मैदानासह या रस्त्यावरही माेठ्या संख्येने दुकाने थाटण्यात अाली हाेती.
  • सिटी काेतवाली ते टिळक राेडवर तयार कापडाची दुकाने उघडी हाेती. अनेकांनी हातगाड्यांवर तयार कपड्यांसह अन्य साहित्याची िवक्री सुरु केली हाेती.
  • जनता भाजी बाजार व निर्माणाधीन उड्डाण पुलाजवळच भाजी फळ विक्रेत्यांनी हातगाड्यावर दुकाने थाटण्यात अाली हाेती.
  • जुने शहरातील श्रीवास्तव चाैक, डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या मागे फळ- भाजीची दुकाने रस्त्यावरच थाटण्यात अाल्याचे रविवारी

२३ मे राेजी िदसून अाले.
गांधी चाैक ते ताजनापेठ दरम्यान रविवारी सकाळी नागरिकांनी अशी गर्दी केली हाेती. त्यामुळे अकाेल्यात कुठे अाहेत निर्बंध, असा प्रश्न हे चित्र पाहिल्यानंतर पडताे.

पाेलिस केवळ चाैकांमध्येच तैनात
डाबकी राेड, जयहिंद चाैक, माेठ्या पुलाजवळ, सिटी काेतवाली, गांधी चाैक, सिव्हील लाईन्स चाैक, जठारपेठ, रेल्वे स्थानक परिसरात पाेलिसांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. यािठकाणी बॅरीकेटस लावण्यात अाली. मात्र येथून जवळच असलेल्या रस्त्यावर नागरिकांचा मुक्तसंचार दिसून अाला. या ठिकाणांवर रविवारी सकाळी ११ नंतरही सुरु हाेती.

शहरातील मुख्य रस्त्यावर कुठे काय िदसले?

  • डाबकी राेडवर तयार कापड, बुट, इलेक्ट्राॅनिक्ससह अन्य िबगर जीवनावश्यक साहित्य िवक्रीची दुकाने सुरु हाेती.
  • जयहिंद चाैकात स्वीटमार्ट, जनरल स्टाेअर्सचे अर्धे शटर उघडे हाेते.
  • जठार पेठ परिसरातील रस्त्यावरच फळ-भाजीची दुकाने हातगाड्यांवर थाटण्यात अाली हाेती.
  • राऊत वाडी, बारा ज्याेर्तिलिंग मंदिर राेडवर माेबाइल फाेन, ब्युटीपार्लर सुरु हाेते.
बातम्या आणखी आहेत...