आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:जिल्ह्यात आतापर्यंतच्या मृतांची संख्या 1000 पार; रुग्ण संख्येत वाढ कायम, प्रशासन हतबल, सर्वाधिक मृत्यू साठ वर्षांवरील व्यक्तींचे

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृत्यू संख्येत 652 ने वाढ, 34,412 जणांची कोविडवर मात

जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट वाढली आहे. दुसऱ्या लाटेचे शंभर दिवस पूर्ण झालेत. आतापर्यंतच्या १०२ दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे ४०,९०१ रुग्ण आढळले. त्यामुळे शंभर दिवसांत प्रतिदिन सरासरी ४०९ पॉझिटिव्ह रुग्णांनी बाधितांचा आकडा वाढला आहे. दुसरीकडे मृतांच्या संख्येतही दुसऱ्या लाटेत ६५२ ने वाढ झाली.फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट सुरू झाली. त्यानंतर मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत संसर्ग, मृतांचा आकडा वाढला. परिस्थिती आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाच्या हाताबाहेर गेली.

रुग्णांना अत्यावश्यक उपचार पुरवणे,संसर्ग रोखणे, असे दुहेरी आव्हान निर्माण झाले. मात्र याचा सामना करताना जिल्ह्याची यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसले. जिल्ह्यातील शंभर दिवसातील कोविड संसर्गाची स्थिती पाहता व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचे होणारे मृत्यू, उशिरा निदर्शनास येणारे रुग्ण, ऑक्सिजन, रेमेडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांसाठी नातेवाइकांवर खाटांसाठी भटकंतीची वेळ आदी बाबी प्रशासकीय यंत्रणेचा निष्क्रिय चेहरा समोर आणणाऱ्या ठरल्या.

आता पर्यंतच्या मृतांची संख्या
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबरच गंभीर रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यूचा आकडा चिंताजनक वेगात वाढत आहे. शनिवारी, २२ मे रोजी एकाच दिवसात ११ मृत्यूंची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या १००४ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे साठ वर्षांवरील व्यक्तींचे अाहेत.

मृतांच्या संख्येचे नकोसे उच्चांक
गेल्या जानेवारीपासून जिल्ह्यातील कोविडबळींची संख्या दर महिन्यात वाढत आहे. त्यात मे मध्ये मृत्यूचा आकडा नकोसा उच्चांक गाठत आहे. जानेवारीत १४ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर फेब्रुवारीत ३१, मार्चमध्ये ८६ मृत्यू होते. एप्रिलमध्ये मात्र मृत्यूच्या संख्येचा कहर होताना दिसला. महिनाभरात २३६ रुग्णांना जीव गमवावा लागला. मे मधील परिस्थिती त्याहूनही गंभीर असल्याचे दिसते. आतापर्यंतच्या २२ दिवसांत ३०० हून अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...