आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टर डोसच्या मोहिम:बूस्टर डोसमध्ये अकोला जिल्हा राज्यात 27 वरून 17 व्या स्थानावर

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सुरु असलेल्या बूस्टर डोसच्या मोहिमेत अकोला जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. अवघ्या आठवड्याभरात अकोला जिल्ह्यातील लसीकरणाच वेग वाढल्याने जिल्ह्याने राज्यात २७ वरून १७ वे स्थान प्राप्त केले आहे. दरम्यान पुढील सुमारे दोन महिने ही गती अशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे मोहिमेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वय वर्षे १८ ते ५९ या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी १५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधित शासकीय लसीकरण केंद्रावरून मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरी आणि ग्रामीण भागात लसीकरणाची गती वाढल्याचे दिसत आहे. २१ जुलैला अकोला जिल्ह्याचे बूस्टर डोसच्या मोहिमेतील स्थान हे २७ व्या क्रमांकावर होते. दरम्यान २९ जुलैला ते १७ व्या क्रमांकावर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...