आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल:अकोला जिल्ह्याचा निकाल 95.84 टक्के; मुलींची टक्केवारी 97.14, तर मुलांची 94.71

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९५.८४ टक्के लागला. यंदाही सर्वाधिक उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलींची आहे. मुलींची टक्केवारी ९७.१५ टक्के तर मुलांची टक्केवारी ९४.७१ आहे. श्रेणी १ मध्ये १० १६८ मुलांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.

जिल्ह्यातून २५,९४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४,८६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अनुर्तीर्ण होण्यात मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या अधिक आहे. विज्ञान शाखेला प्रवेशित विद्यार्थांची संख्या सर्वाधिक राहिली. विज्ञान शाखेचा निकालही ९९.१२ टक्के लागला असून, त्यात मुलींची टक्केवारी ९९.३० टक्के आहे. कला शाखेचा निकाल ९१.९० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९७.०६ टक्के, व्होकेशनल शाखेचा निकाल ९१.११ टक्के आहे. जिल्ह्यात यंदा बार्शीटाकळी तालुक्याने निकालात बाजी मारली. त्याची टक्केवारी ९७.३४ आहे.

बातम्या आणखी आहेत...