आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना:अकोला जिल्हा शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्हा शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेने प्रमाणेच शिंदे गटाने दोन जिल्हा प्रमुख नियुक्त केले आहेत. यात अश्विन नवले आणि विठ्ठल सरप पाटील यांची निवड केली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना घेऊन चालणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रतोद भरतशेठ गोगावले, आ. संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

यात जिल्हाप्रमुख पदी अश्विन उद्धवराव नवले, विठ्ठल सरप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, अकोट विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विठ्ठल सरप पाटील यांची देखील जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे बाळापूर, अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अकोला महानगर प्रमुखपदी योगेश रूपचंद अग्रवाल, उपजिल्हा प्रमुखपदी शशिकांत वामनराव चोपडे, निवासी उपजिल्हा प्रमुखपदी योगेश राजूभाऊ बुंदिले यांची नियुक्ती केली आहे. या वेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहोचवण्यासाठी व पक्ष वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची सूचना देखील दिली.

बातम्या आणखी आहेत...