आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक सहकारी पतसंस्था; अपात्रतेच्या कार्यवाहीला स्थगिती:आता पुढील आठवड्यात होणार सुनावणी

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह दाेन संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी (सहकारी संस्था) अपात्र ठरवण्यात आल्याच्या कार्यवाहीला विभागीय सहनिबंधकांनी स्थगिती दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी 12 जानेवारी राेजी हाेणार आहे. या आदेशामुळे सत्ताधारी व विराेधक अशा दाेघांनीही दिलासा मानला जात आहे.

गतवर्षी झालेल्या शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या िनवडणुकीत सत्तांतरण झाले. शिक्षकांच्या दिग्गज संस्थांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. स्पष्ट बहुमत असल्याने सत्ताधाऱ्यांचा एकिकडे निर्णयांचा धडका सुरू असतानाच विराेधकही सक्रिय झाले. दरम्यान तीन जणांच्या अपात्रतेबाबतचे प्रकरण िजल्हा उपनिबंधकांकडे पाेहाेचले. पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड (संचालक म्हणून) यांच्यासह संचालक मारोती वरोकार आणि ज्ञानेश्वर टोहरे यांना अपात्र करण्यात आले हाेते. या आदेशाला विभागीय सहनिबंधकांकडे आव्हान दिले हाेते.

काय आहे आदेश?

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन व सहकार विभागाच्या सन 2021 च्या आदेशानुसार विभागीय सहनिबंधकांनी आदेश जारी केला. अध्यक्ष शशिकांत गायकवाड यांचा स्थगितीचा अर्ज मंजूर करण्यात येत असून, याप्रकरणी पुढील सुनावणी 12 जानेवारीला दुपारी 3 वाजता हाेणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

असे आहेत दावे

  • जिल्हा उपनिबंधकांकडूनही जबाब सादर करण्यात आला. अध्यक्ष हे दुसऱ्या संस्थेतून निवडून आल्यानंतर त्यांनी 10 दिवसाच्या आत काेणत्याही एका संस्थेतून राजीनामा देणे ही, त्यांची जाबबदारी हाेती. मात्र त्यांनी मुदतीत राजीमान दिल्याने दाेन्ही संस्थांचे पदे समाप्त झाली, असे जबाबात नमूद केले.
  • अध्यक्ष शशिकांत गायकवाड यांंनी निवडून आल्यानंतर 10 दिवसातच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद मागासगर्वीय सहकारी पंत संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. तसेच दाेन्ही पतसंस्था एकाच प्रवर्गामध्येही येत नाहीत. त्यामुळे तरतुदीचे पालन न करताच आदेश पारीत झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. अखेर अपात्रतेच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...