आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण धारकांना जागा रिकामी करण्यासाठी 3 दिवसांचा वेळ:माता नगर भागात शनिवारी होणार कारवाई

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक 4 (टेंपल गार्डन) लगत असलेल्या जागेतील अतिक्रमण धारकांना जागा रिकामी करण्यासाठी तीन दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांनी जागा रिकामी न केल्यास शुक्रवार अथवा शनिवारी या अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली.

टेम्पल गार्डन लगत तसेच नुतन हिंदी शाळेच्या मागे माता नगर वसाहत आहे. या माता नगर भागात आवास योजनेतील घरे मंजुर झाली होती. घरकुलांचे बांधकाम करताना जागा रिकामी करणे गरजेचे होते. मात्र तो पर्यंत कुठे रहावे? असा प्रश्न या झोपडपट्टी धारकांसमोर निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेवून माणुसकीच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने या वस्ती लगत असलेली जागा घरकुलांचे बांधकाम पूर्ण होईस्तोवर दिली.

3 दिवसात जागा रिकामी करा

या जागेवर 9- जणांनी कच्ची घरे बांधली. तर दुसरीकडे काही घरकुलांची कामे झाली आहेत. अद्याप काही घरकुलांची कामे राहिलेली आहे. मात्र जी जागा या नागरिकांना देण्यात आली, त्या जागेवर बेघर निवारा बांधण्यात येणार आहे. यासाठी शासनाने निधी दिलेला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र जो पर्यत जागा रिकामी केली जात नाही, तो पर्यंत बेघर निवाऱ्याचे बांधकाम करणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेने या नागरिकांनी मंगळवारी तीन दिवसात जागा रिकामी करण्याची सुचना केली आहे.

पोलिस बंदोबस्ताची मागणी

गुरुवारी सायंकाळ पर्यंत तीन दिवसाची मुदत संपणार आहे. त्यामुळे शुक्रवारी अथवा शनिवारी या जागेवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान जुन्या धान्य बाजारापेक्षा ही कारवाई काळजीपू‌र्वक करावी लागणार आहे. जुन्या धान्य बाजारात दुकाने होती. तर या ठिकाणी कच्ची घरे आहेत. त्यामुळे घरातील नागरिकांना पूर्णपणे बाहेर काढल्या शिवाय कारवाई करता येणे अवघड आहे.

महिला जिल्हाधिकारी कार्यालयात

दरम्यान जागा रिकामी करावयाची असल्याने आता आम्ही राहणार कोठे? असा प्रश्न या भागातील महिलांनी उपस्थित केला. प्रारंभी या महिला माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांच्या कार्यालयात पोचल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली.

बुधवारी दुपारी परिसरातील महिला-पुरुषांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. नागरिकांना घरकुलाचा लाभ न देता अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करणे योग्य नसून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर केलेल्या निवेदनात केला.

काय आहे निवेदनात ?

  • माता नगरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार आमच्या जागेवर घरकुल बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ताेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात राहू शकता, असेही ताेंडी सांगण्यात आले.
  • जवळपास 162 घरांपैकी 40 घरे शासनाकडून बांधून देण्यात आली. विद्युत व पाणी पुरवठाही हाेत आहे.
  • सध्या थंडीचे दिवसातच मनपाने जागेवरून काढून देण्याची नाेटीस बजावली आहे. अशा स्थितीत घरकुल अर्जदारांसाठी स्थायी स्वरुपात राहण्याची व्यवस्था करावी.
  • गरीब कुटुंब कुठे राहतील, याचाही विचार प्रशासनाने करावा, अशी भावनाही रहिवाशांनी निवेदनात व्यक्त केली.

प्रशासन, लाेकप्रतिनिधींकडे धाव

जागा रिकामी करावयाची असल्याने आता आम्ही राहणार कोठे? असा प्रश्न या भागातील महिलांनी उपस्थित केला आहे. प्रारंभी या महिला माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या कार्यालयात पोचल्या. त्यानंतर महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे पवन महल्ले यांच्यासह संकेत गाडे, किशन गुडे, आकाश तायडे, नितीन चक्रनाराण, रामदास तायडे यांच्यासह महिला-पुरुष माेठ्या संख्येने हाेते.

बातम्या आणखी आहेत...