आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातानगर भागातील कारवाई जैसे-थे ठेवा:न्यायालयाचे आदेश; शुक्रवारी होणारी कारवाई अतिक्रमणविरोधी पथकाने थांबवली

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक 4 (टेंपल गार्डन) लगत असलेल्या जागेतील अतिक्रमणावरील कारवाई बाबत न्यायालयाने जैसे-थे ठेवण्याचे आदेश दिले. परिणामी महापालिका प्रशासनाने शुक्रवारी केली जाणारी कारवाई तुर्तास थांबवली. या प्रकरणाची सुनावणी आता 16 जानेवारी रोजी होणार आहे.

टेम्पल गार्डन लगत तसेच नुतन हिंदी शाळेच्या मागे माता नगर वसाहत आहे. या माता नगर भागात आवास योजनेतील घरे मंजुर झाली होती. घरकुलांचे बांधकाम करताना जागा रिकामी करणे गरजेचे होते. मात्र तो पर्यंत कुठे रहावे? असा प्रश्न या झोपडपट्टी धारकांसमोर निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेवून माणुसकीच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने या वस्ती लगत असलेली जागा घरकुलांचे बांधकाम पूर्ण होईस्तोवर दिली. या जागेवर 90 जणांनी कच्ची घरे बांधली. तर दुसरीकडे काही घरकुलांची कामे झाली आहेत. अद्याप काही घरकुलांची कामे राहिलेली आहे. मात्र जी जागा या नागरिकांना देण्यात आली, त्या जागेवर बेघर निवारा बांधण्यात येणार आहे. यासाठी शासनाने निधी दिलेला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र जो पर्यंत जागा रिकामी केली जात नाही, तो पर्यंत बेघर निवाऱ्याचे बांधकाम करणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेने या नागरिकांनी मंगळवारी तीन दिवसात जागा रिकामी करण्याची सुचना दिली होती.

दरम्यान अतिक्रमण धारकांच्या वतीने या प्रकरणात न्यायालयाद दाद मागण्यात आली. न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणात जैसे-थे ठेवण्याचे आदेश दिल्याने ही कारवाई थांबविण्यात आली. आता या प्रकरणात 16 जानेवारी रोजी सुनावणी होत आहे. न्यायालयाच्या सुनावणीवरच या कारवाईचे भवितव्य अवलंबुन आहे. दरम्यान अतिक्रमण धारकांना मात्र तुर्तास दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...