आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासदैव गजबजलेल्या जुन्या धान्य बाजाराच्या जागेची आता भग्नावस्था झाली आहे. प्रशासनाने नियमानुसार या जागेवरील दुकानांवर कारवाई केली असली तरी या कारवाईमुळे शेकडो मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे? असा प्रश्न या कामगार, मजुरांसमोर निर्माण झाला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात जुन्या धान्य बाजार येतो. नाव जुना धान्य बाजार असले तरी या ठिकाणी धान्याची विक्री आता होत नव्हती. धान्याची विक्री या बाजाराच्या बाजुला अद्यापही सुरू आहे. समोर भाजी बाजार, सराफा बाजार, बाजुला जुना कापड बाजार असल्याने हा परिसर सदैव माणसांनी फुललेला असतो. जुना धान्य बाजारात किराणा, स्टेशनरी, कटलरी, चप्पल विक्री, ईलेक्ट्रिक, ईलेक्ट्रॉनिक्स आदीसह विविध वस्तुची विक्री करणारी दुकाने होती. याच बरोबर सोन्या चांदीची दागिने घडविण्याचे कामही बाजारात मोठ्या प्रमाणात केले जात होते. यामुळेच येथे दागिने घडविणारे बंगाली कामगारही मोठ्या प्रमाणात होते. 101 पेक्षा अधिक व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करीत होते.
प्रत्येक व्यावसायीकाकडे किमान तीन ते चार कामगार, मजुर काम करीत होते. परिणामी दररोज कोट्यवधी रुपयाची उलाढाल या जुना धान्य बाजारात होत होती. या जागेवर बांधलेल्या दुकानांमुळे प्रशासनाने ही कारवाई केली. या कारवाई जबाबदार कोण? हा प्रश्न वेगळा असला तरी कारवाईमुळे शेकडो मजुरांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामुळेच आता केवळ आठवणी राहिल्या आहेत.
जुन्या धान्य बाजाराला लागून असलेल्या हॉटेल्स, चहा, पान - गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरही बाजारावर झालेल्या कारवाईचा परिणाम झाला आहे. या दुकानातून जुन्या धान्य बाजारातील व्यावसायिक, मजुर, कामगार चहा, नास्ता, पान आदींची खरेदी करीत होते. मात्र आता व्यवसायच राहिला नसल्याने या व्यावसायिकांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
जुन्या धान्य बाजाराच्या जागेवर हजारो टिन, दुकानांचे शटर, तुटलेले दरवाजे, पक्क्या दुकानाचे कॉक्रीट, सोनार व्यावसायिकांच्या मशिन आदी साहित्य पडलेले आहे. हे साहित्य उचलण्यासाठी बुधवारीच व्यावसायिकांनी गर्दी केली होती. तर गुरुवारी या मलब्यात वस्तु शोधण्यासाठी टिन-टप्पर संकलीत करणाऱ्यांची झुंबड उडाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.