आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदपत्रे सादर न केल्यास घरकुल होणार रद्द:लाभार्थ्यांना अखेरची संधी देण्यासाठी महापालिकेत मेळाव्याचे आयोजन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेत घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. ही कागदपत्रे सादर न केल्यास लाभार्थ्यांचे मंजूर घरकुल रद्द केले जाणार आहे. या अनुषंगाने लाभार्थ्यांना अखेरची संधी देण्यासाठी आवास योजना कक्षाच्या वतीने 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात मंजुर लाभार्थ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 7 हजार 640 घरकुले मंजुर झाली होती. यापैकी विविध त्रुट्यांमुळे 972 घरकुले अपात्र ठरली. तर 1 हजार 927 घरकुलांची कामे सुरु आहेत. तर यापूर्वी 2 हजार 500 घरकुले मंजुर झालेली आहेत.

मंजुर लाभार्थ्यांमध्ये गुंठेवारी पद्धतीच्या लाभधारकांचाही समावेश आहे. गुंठेवारी लाभधारकांचे प्लॉटचे नियमानुकुल झाले. त्यामुळे बांधकामाचा नकाशा मंजूरीचा मार्ग मोकळा झाला. मात्र विविध कारणांनी अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचा नकाशा मंजुरीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नगररचना विभागात दाखल केलेली नाहीत. त्यामुळे मंजुर घरकुलांच्या बांधकामाचा नकाशा अद्यापही मंजुर झालेला नाही.

एकीकडे नकाशा मंजुर नाही तर दुसरीकडे हजारो लाभार्थी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे गुंठेवारीचे नियमानुकुल झाल्या नंतर ज्या लाभार्थ्यांनी नकाशा मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यांना अखेरची संधी देण्यासाठी महापालिकेच्या वतीने दोन दिवशीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात या लाभार्थ्यांना अत्यावश्यक असणाऱ्या कागदपत्राच्या पूर्ततेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात हजर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या नंतरही कागदपत्राची पूर्तता न केल्यास मंजुर घरे रद्द केले जाणार आहेत.

4741 लाभार्थ्यांनी कागदपत्रे दाखल केली नाहीत

नकाशा मंजुरीसाठी सात-बारा, प्रतिज्ञा पत्र तसेच प्लॉट माणसाच्या नावाने असेल तर तो महिलेच्या नावाने करणे आदी विविध कागदपत्राची गरज आहे. या कागदपत्राची पूर्तता न केल्याने 4 हजार 741 लाभार्थ्यांचा घरकुलाचा नकाशा रखडला आहे. तर काही लाभार्थ्यांकडे आर्थिक अडचण आहे. नकाशा मंजुरीसाठी कागदपत्राची पूर्तता न केल्यास मंजुर घरकुले रद्द केली जावून ही घरकुले नविन लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...