आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. अकोला जिल्ह्यातील २६५ ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे कारभारी जाहीर होण्यास सुरुवात झाली असून यात २५८ सरपंचांचाही समावेश आहे.
अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असून, काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. विजयानंतर उमेदवार व त्यांच्या समथर्कांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
या मतदारांनी निवडले सरपंच
जिल्ह्यात २ लाख ४६ हजार ९७३ मतदारांनी सरपंच व सदस्यांची निवड केली. यात पुरुष १ लाख ३२ हजार ८६ तर १ लाख १४ हजार ८८४ महिला मतदारांचा समावेश आहे. यात तेल्हारा तालुक्यात २५, ०२९ मतदारांनी मतदान केले. अकोट- ४१९५४, मूर्तिजापूर-४४७६४, अकोला- ४५१२५, बाळापूर- २२६४२,बार्शीटाकळी-३९२१५ आिण पातूर तालुक्यातील २८२४४ मतदारांचा समावेश आहे.
या ठिकाणी उमेदवार जाहीर
२६५ ग्राम पंचायतसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येत आहेत. यात तेल्हारा तालुक्यात २३, अकोट- ३६, मूर्तिजापूर-५१, अकोला-५४, बाळापूर २६, बार्शीटाकळी-४७ तर पातूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सरपंच जाहीर
२५८ ठिकाणच्या सरपंच पदाचे निकाल जाहीर होत आहेत .तेल्हारा तालुक्यातील २२, अकोट-३४, मूर्तिजापूर-५०, अकोला-५३, बाळापूर-२६,बार्शीटाकळी-४६ व पातूर तालुक्यातील २७ जागांचा समावेश आहे.
येथील उमेदवार अविरोध
सदस्य झाले विजयी
निवडणूक एकूण २०७४ सदस्यांसाठी होणार होती. मात्र ५७१ सदस्य बिनविरोध विजयी झाले. २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नव्हता. अखेर १४७४ सदस्य पदासाठी निवडणूक झाली आणि मंगळवारी निकाल घोषित होत आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.