आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला ग्रामपंचायत निवडणूक:2 वाजेपर्यंत 44.27 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेकांची प्रतिष्ठापणाला

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात झालेल्या सत्तांतणानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासह ग्राम पंचायत सदस्यत्वासाठी रविवारी मतदानाला प्रारंभ झाला आहे. . निवडणुकीत एकूण 1 हजार 732 जागांसाठी 4 हजार 803 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 3 लाख 7 हजार 640 मतदार आहेत. जिल्ह्यात 826 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या असून, काही ठिकाणी मात्र तुर्तास तरी अल्प प्रतिसाद आहे. दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. 179 केंद्र संवेदनशील केंद्रांवर तुलनेने जादा पोलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेत 3 हजार 867 कर्मचारी सक्रिय झाले आहेत.

सकाळपासून दुपारपर्यंत 22.83 टक्के मतदान झाले. सकाळी 9.30 वाजताची मतदानाची टक्केवारी 7.38 हाेती. त्यामुळे मतदनाची टक्केवारी वाढतच असल्याचे दिसून येत आह. मतदान सायंकाळी 5.30 पर्यंत करता येणार आहे.

सर्वाधिक अकाेला तालुक्यात

सर्वाधिक अकाेला तालुक्यातील 54 ग्रा.पं.अंतर्गत मतदान सुरु आहे. या तेल्हारा तालुक्यात 23, अकोट- 36, मूर्तिजापूर-51, बाळापूर 26, बार्शीटाकळी-47 तर पातूर तालुक्यातील 28 ग्रा.पं.मध्ये मतदान हाेत आहे. एकूण 679 प्रभागातून 1474 सदस्यांसाठी मतदान हाेत आहे.

सरपंचपदासाठी 258 ठिकाणी निवडणूक

सरपंचपदासाठी एकूण 265 ठिकाणी मतदान हाेणार हाेते. मात्र चार जागा बिनविराेध झाल्या असून, तीन ठिकाणी उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे 258 जागांसाठी मतदान हाेत आहे.

त्यामुळे सुरू आहे घमासान
ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये राजकीय घमासान हाेत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरील सत्तेवर आणि सत्तेसाठी ऑक्टाेबर महिन्यात घडलेल्या घडामाेडींवर नजर टाकल्यास दिसून येते. उर्वरित अडीच वर्षांपासून ऑक्टाेबर महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडली हाेती. बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर व तेल्हारा पंचायत समित्या (संपूर्णत:) जि.प.तील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडे आहेत. अकाेला येथे भाजपचा सभापती आहे. अकाेट व बार्शीटाकळी येथे शिवसेनेचा सभापती आहे. बार्शीटाकळी व अकाेट व येथे सत्ताधारी वंचितला बाजूला ठेवत शिवसेना, भाजप, काँग्रेस, प्रहार जनशक्ति पक्ष एकत्र आले हाेते. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व चारही सभापती पदे वंचितच्या ताब्यात आहेत.

बातम्या आणखी आहेत...