आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी संबंधित सर्व विभागांचा बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला. यानिवडणुकीसाठी एकूण मतदान केंद्र ८३२ असून त्यातील संवेदनशील मतदान केंद्र १७९ आहेत. ३ लाख ८ हजार ३१७ मतदार हक्क बजावणार आहेत. मतदान रविवार वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेहत हाेणार असून, मतमाेजणी मंगळवारी होणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतरची स्थिती
उमेदवारी अर्जांची छाननी व उमेदवारी माघारीनंतर जिल्ह्यात आता तेल्हारा तालुक्यात २३, अकोट- ३६, मूर्तिजापूर-५१, अकोला-५४, बाळापूर २६, बार्शीटाकळी-४७ तर पातूर-२८ अशा एकूण २६५ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार आहे. यात निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या ६७९ असून त्यातून १४७४ सदस्यांची निवड व्हावयाची आहे.
एकूण ५७१ सदस्य हे बिनविरोध ठरले आहेत, २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण अविरोध प्रभागांची संख्या १३८ आहे. सरपंच वगळता ५ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य अविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा-१, अकोट-१, अकोला-३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सरपंचपदासाठी २५८ ठिकाणी निवडणूक
सरपंचपदासाठी २५८ जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार अविरोध ठरले असून चार ठिकाणी सरपंचपदाकरीता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही. एकंदर सरपंच व सदस्य असे मिळून १६९५ जण निवडणूक रिंगणात आहेत.
असे आहेत मतदार
ग्राम पंचायत निवडणुकीत एकूण ३ लाख ८ हजार ३१७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १ लाख ६१ हजार ६५९ पुरुष तर १ लाख ४६ हजार ६५४ महिला व ४ इतर मतदारांचा समावेश आहे.
तालुका मतदार संख्या
पोलिस बंदोबस्त
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ३८७६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४२९३ मनुष्यबळ संख्या उपलब्ध करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.