आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध बांधकाम धारकांना 24 तासांची नोटीस बजावणार:पूर्व अन् दक्षिण झोनमध्ये शनिवारी वितरीत केल्या जातील नोटीस

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंजुर नकाशापेक्षा अधिक बांधकाम करणाऱ्या मालमत्ता धारकांना 24 तासाच्या आत स्वत: अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटीस शनिवारी बजावल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पूर्व आणि दक्षिण झोनमध्ये या नोटीस बजावल्या जाणार आहेत.

मंजुर नकाशापेक्षा अनेक मालमत्ता धारकांनी अधिक बांधकाम केले आहे. हे बांधकाम हार्डशिप अ‍ॅन्ड कंपाऊंडिग योजनेत काही प्रमाणात वैध करता येते. मात्र यासाठी दंडाच्या रकमेचा भरणा करावा लागतो. तसेच फ्रंट मार्जीन मात्र नियमानुसार जेवढी सोडणे आवश्यक आहे. तेव्हढी सोडावीच लागणार असून पार्किंगही ठेवावी लागणार आहे. मात्र या योजनेत जेव्हढे प्रस्ताव दाखल होतील, तेवढ्या प्रमाणात महापालिकेला महसुल मिळणार आहे. या अनुषंगानेच महापालिका प्रशासनाने हार्डशिप अ‍ॅन्ड कंपाऊंडिग योजना सुरु केली आहे.

मात्र या योजनेला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यापूर्वी ज्या नागरिकांना सात दिवसाच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी ज्या नागरिकांनी हार्डशिप अ‍ॅन्ड कंपाऊंडिग योजनेत प्रस्ताव सादर केलेले नाहीत. किंवा ते प्रस्ताव या योजनेत वैध होवू शकत नाहीत. अशा मालमत्ता धारकांना आता 24 तासाची नोटीस बजावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी पूर्व आणि दक्षिण झोनमध्ये या नोटीस बजावण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम आणि उत्तर झोन मध्ये या नोटीस बजावल्या जातील.

पाडकामाचा खर्च मालमत्ता धारकाला द्यावा लागणार

नोटीस मिळाल्या नंतर 24 तासाच्या आत संबंधित मालमत्ता धारकाने मंजुर नकाशा पेक्षा बांधलेले अतिरिक्त बांधकाम स्वत: पाडण्यास प्रारंभ न केल्यास हे अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या वतीने पाडण्यात येणार आहे. मात्र या पाडकामाचा खर्च हा संबंधित मालमत्ता धारकाला द्यावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...