आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola Lags Behind In Online Electricity Bill Payments; Circulation Payments Of Rs 639.37 Crore, An Increase Over The Previous Year |marathi News

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइन वीजबिल पेमेंटमध्ये अकोला पिछाडीवर; परिमंडळात 639.37 कोटीचा भरणा, मागील वर्षीच्या तुलनेत वाढ

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणला राज्यभरातील ग्राहकांनी कॅशलेस वीजबिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र, अकोला परिमंडळ यात पिछाडीवर आहे. राज्यामधील एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७२ टक्के रकमेचा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन पर्याय नविडला आहे. मात्र, अकोल्यामध्ये एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी ६३९.३७ कोटी अर्थात ४७.७२ रकमेचा भरणा ऑनलाइन झाला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत मात्र अकोला परिमंडळामध्ये ऑनलाइन विजबिल पेमंेट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी ऑनलाइनद्वारे वीजबिल भरण्याचे प्रमाण नगण्य होते. ऑनलाइन वीजबिल भरण्यास ग्राहकांनी पसंती दिल्याने हे प्रमाण वाढले. विशेषत: करोना काळात ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. ऑनलाइन वीजबिल भरीत असल्यास त्या ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सूट मिळते. महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सर्व सेवा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट व महावितरण मोबाइल ॲप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र आरटीजीएस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

त्यामुळे प्रामुख्याने दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाइन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे.

अशी आहे परिमंडळाची टक्केवारी
राज्यात औरंगाबाद परिमंडल ८५.७८ टक्के, लातूर ५१.९६ टक्के, नांदेड ४८.४८ टक्के, भांडूप ७०.१५ टक्के, जळगाव ६१.३८ टक्के, कल्याण ७८.६७ टक्के, कोकण ६५.१६ टक्के, नाशिक ७४.१० टक्के, अकोला ४७.७२ टक्के, अमरावती ४८.९८, चंद्रपूर ६३.६७ टक्के, गोंदिया ६०.२२ टक्के, नागपूर ६९.५६ टक्के, बारामती ७४.८५ टक्के, कोल्हापूर ६९.२४ टक्के, पुणे ८१.१६ टक्के एकूण रकमेचा भरणा ऑनलाइन केला आहे. तर अकोल्यामध्ये हे प्रमाण सर्वाधिक कमी ४७.७२ आहे.

बातम्या आणखी आहेत...