आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात काळाबाजार:पानटपरीतून 3 तर घरातून 16 सिलिंडर जप्त; पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एक आरोपी हा पानटपरीतून सिलिंडर विकत होता, तर दुसरा घरातून सिलिंडर विकत असल्याचे पोलिसांना दिसून आला. एका पानटपरीतून तीन तर एका घरातून 13 असे 16 सिलिंडर पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी केली. आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून कधीपासून आरोपी हा काळाबाजार करीत आहेत याचा तपास सुरू केला आहे.

विनापरवाना विक्री

पोलिस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, पळसोबढे या गावात अवैध रित्या घरगुती गॅस सिलिंडर विकले जात आहेत. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पळसोबढे येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील अमोल लांडे याच्या पानटपरीमध्ये पोलिसांना तीन सिलिंडर दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे परवाना दिसून आला नाही. तसेच भास्कर रामचंद्र फरकुंडे याच्या घरातही पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या घरात 13 घरगुती गॅस सिलिंडर विनापरवाना विक्री करिता दिसून आल्याने पोलिसांनी पान टपरीमधून तीन व घरातून 16 सिलेंडर जप्त केले.

गुन्हा दाखल

बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी विरुद्ध जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3,7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने पळसो बढे येथे केली आहे. यापूर्वीही जिल्ह्यामध्ये घरगुती सिलिंडरचा वापर व्यवसायासाठी करत असल्याचे समोर आले आहे. त्यावर जुने शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...