आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला:वर्दीतील पोलिस आणि ड्युटीवर नसलेल्या पोलिसात भररस्त्यावर फ्रीस्टाइल, व्हिडिओ व्हायरल

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या भांडणात पोलिस पत्नीने सुद्धा घेतली उडी, वर्दीतील पोलिसाला काठीने केली मारहाण

आळशी प्लॉट येथील एका किराणा दुकानावर सिविल ड्रेसमध्ये असलेला पोलिस आणि त्याची पत्नी किराणा घेण्यासाठी आले होते. इतक्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने गर्दी झाल्यामुळे इतर नागरिकांना हटकले तसेच ड्रेस वर नसलेल्या पोलिसालाही हटकले. मी पण पोलिस आहे मला हटकतो का? असे म्हणून दोघांमध्ये बाचाबाची झाली. या वेळी दोघांनी एकमेकांना धूळ चारली. ड्युटीवर असलेल्या पोलिसाला होत असलेली बेदम मारहाण पाहून, काही वेळ नागरिक गोंधळून गेले. इतक्यात स्थानिक नगरसेवकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पोलिस असल्याने रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. 

भांडणात पोलिस पत्नीची उडी, वर्दीतील पोलिसाला काठीने मारहाण 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने या दाम्पत्याला सोशल डिस्टनसिंग ठेवण्याची विनंती केली आणि वर्दीवर नसलेल्या पोलिस आणि वर्दीवर असलेल्या पोलिसात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. बाचाबाची विकोपाला गेल्याने त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र याचा काही उपयोग झाला नाही. या भांडणात पोलिस पत्नीने सुद्धा उडी घेतली आणि काठीने वर्दीवर असलेल्या पोलिसाला मारहाण केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...