आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका पाणी पुरवठा विभागाने चालु आर्थिक वर्षात ७ कोटी ७० लाख ३१ हजार १७० रुपयाची पाणीपट्टीची वसुली केली. मात्र अद्यापही कोट्यवधी रुपयाची पाणीपट्टी नागिरकांकडे थकीत आहे.
महापालिकेचे मालमत्ता करा नंतर पाणीपट्टी हे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र पाणीपट्टी वसुलीकडे गेल्या दोन वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. पाणीपट्टी देयक वितरणाचे काम महापालिका कर्मचारी करतात. यासाठी नळाचे रिडींग घेणे, रिडिंग देयके तयार करणाऱ्या कंपनीला देणे आणि देयके घेवून वितरीत करणे, अशी जबाबदारी व्हॉल्वमन, फिटर यांना करावी लागते.
दरम्यान देयके तयार करणाऱ्या कंपनीचे देयक थकल्याने कंपनीने देयक तयार करण्याचे काम बंद केले होते. त्यामुळे नागरिकांना पाणीपट्टीची देयकेच मिळाली नाहीत. त्यामुळे पाणीपट्टी वसुली ठप्प झाली होती. गेल्या दोन महिन्यापासून पुन्हा पाणीपट्टी देयक तयार करण्याचे काम कंपनीने सुरु केले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे पाणीपट्टीची वसुली मंदावली.
अद्याप ७ कोटी पाणीपट्टी थकीत
महापालिकेला वर्षाकाठी १२ ते १५ कोटी रुपये पाणीपट्टी अपेक्षित आहे. आता पर्यंत ७ कोटी रुपये पाणीपट्टी वसुल झाली असली तरी अद्याप महापालिकेला ७ कोटी रुपये थकीत पाणीपट्टीची वसुली करावी लागणार आहे.
४२ हजार नळांना मिटर
महापालिका क्षेत्रात एकुण ७१ हजार ८०० वैध नळजोडण्या आहेत. यापैकी ४२ हजार ४३३ नळधारकांनी नळांना मिटर लावले आहे. तर २९ हजार ३६७ नळांना अद्यापही मिटर लावलेले नाही. तसेच अद्यापही हजारो नळजोडण्या अवैध आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.