आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिकेचा पुढाकार:दिव्‍यांग यूडीआयडी प्रमाणपत्र, ओळखपत्राकरिता जून महिन्‍यात विशेष मोहीम

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या दिव्‍यांग व्यक्तींसाठी अकोला मनपाच्‍या वतीने युडीआयडी प्रमाणपत्र व ओळखपत्र काढण्‍याकरिता 30 जून 2022 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

दिव्यांगांसाठी योजना

शासनाकडून दिव्यांगासाठी विविध योजना राबविल्या जातात. शासनाच्‍या या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व दिव्‍यांग ओळखीसाठी यूडीआयडी अर्थात वैयक्तिक प्रमाणपत्र व ओळखपत्र याची दिव्‍यांग व्यक्तींना गरज भासत असते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुध्‍दा हे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपयोगात येते. मात्र, या यूडीआयडी प्रमाणपत्रासंदर्भात दिव्‍यांगांना माहिती नसल्‍याने अनेक दिव्‍यांग व्यक्ती शासनाच्‍या विविध योजनांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेवून दिव्‍यांग कल्‍याण आयुक्‍तालय यांच्‍या सूचनेनुसार दिव्यांग व्यक्तींसाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

या कागदपत्राची गरज

ज्‍या दिव्‍यांग व्यक्तींनी अद्यापपर्यंत यूडीआयडी कार्ड काढलेले नाही किंवा ज्‍यांचेकडे दिव्‍यांगत्‍वाचे अन्‍य विभागाचे प्रमाणपत्र आहे, अशा सर्व दिव्यांगांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वार्ड क्रमांक 106 मधील हेल्‍प डेस्‍कची मदत घेउन तपासणी करून यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र नोंदणी करून घ्‍यावी. यूडीआयडी कार्ड नोंदणीकरिता दिव्‍यांग व्‍यक्तींनी आपले आधार कार्डची झेरॉक्‍स प्रत, पासपोर्ट फोटो, जुने दिव्‍यांगत्‍व प्रमाणपत्र असल्‍यास त्‍याची प्रत घेउन हेल्‍प डेस्‍कच्या मदतीने 30 जून 2022 पूर्वी सुरू असलेल्‍या विशेष मोहिमेचा लाभ घेउन यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...