आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola Municipal Election May 31 Those Who Have Completed 18 Years Of Age Can Register In The Electoral Roll; Opportunity To Vote For The First Time

अकोला महापालिका निवडणूक:31 मे पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना नोंदवता येणार मतदार यादीत नाव

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 31 मे 2022 पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. पूर्वी 1 जानेवारी पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली होती. त्यामुळे आता नव मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे.

मतदार यादी कार्यक्रम

निवडणूक आयोगाने यापूर्वी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार 1 जानेवारी 2022 पर्यंत ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली. त्यांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला. मात्र, आता ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने टप्प्या-टप्प्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे सुरू केले आहे. यापूर्वी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. तर आता मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

7 जुलै रोजी अंतिम यादी

17 जून 2022 पर्यंत प्रभाग निहाय मतदार प्रारुप यादी तयार करून ती प्रसिद्ध करावी लागणार आहे. 15 ते 25 जून पर्यंत प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांवर नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर आलेल्या हरकतींची दखल घेत, 7 जुलै 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

457 बीएलओ नियुक्त

मतदार यादीत 31 मे पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी महापालिकेने 457 बीएलओ नियुक्त केले असून बीएलओ यांच्यावर 20 अधिकारी सुपरवायझर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली, अशा नव मतदारांच्या नावाचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येतही वाढ होईल.

बातम्या आणखी आहेत...