आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या स्वत:च्या खात्यात कमी पैसा असतानाही प्रशासनाने ‘जुगाड’ जुळवल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 चे वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या पावणे दोन वर्षापासून महापालिका कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जात आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला कर्मचाऱ्यांना वेतन मिळत आहे. प्रत्येक महिन्याला कायम आस्थापनेवरील, मानसेवी, कंत्राटी, शिक्षकांचे (50 टक्के वेतन), सेवा निवृत्त कर्मचारी यांचे वेतन देण्यासाठी 12 कोटी रुपये लागतात. तर जीएसटीचे अनुदान दरमहा केवळ 7 कोटी 29 लाख रुपये मिळते.
कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला
उर्वरित पाच कोटी रुपयाची जुळवा-जुळव महापालिकेला करावी लागते. परंतु जानेवारी अखेरीस महापालिकेच्या स्वत:च्या खात्यात केवळ 35 लाख रुपये शिल्लक होते. तसेच एक कोटी रुपयाचे मालमत्ता कराचे धनादेश होते. तर दुसरीकडे जीएसटीचे अनुदानही प्राप्त झालेले नव्हते. त्यामुळे जानेवारी महिन्याचे वेतन विलंबाने दिले जाण्याची शक्यता महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र आयुक्तांनी पुढाकार घेवून जानेवारी महिन्याच्या वेतनाचे जुगाड जुळवले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.
असे जुळवले जुगाड
महापालिकेला प्राप्त झालेल्या स्वत:च्या महसुलापैकी काही महसुल वेतनावर खर्च करता येत नाही. ही रक्कम निश्चित केलेल्या कामावरच खर्च केली जाते. त्यामुळे काही रक्कम महापालिकेकडे पडून असते. या रकमेतून वेतनाच्या खात्यात रक्कम वळती केली जाते. मालमत्ता कर, पाणीपट्टी, आदी विभागातून महसुल प्राप्त झाल्या नंतर घेतलेली रक्कम पुन्हा त्या खात्यात वळती केली जाते.
तसेच या महिन्यात महापालिकेला जीओ कंपनीकडून केबल टाकण्याच्या कामाचे जवळपास 9 कोटी रुपये शुल्क प्राप्त होणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून प्रशासनाने वेतनाचे जुगाड जुळवले.
व्हॉल्व दुरुस्तीचे काम पूर्ण
शहरात वितरण प्रणालीवरील 450 आणि 400 मिली मिटर व्यासाचा व्हॉल्व दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. परिणामी तीन जलकुंभावरुन शुक्रवारी विविध भागांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. शिवनगर भागातील दोन जलकुंभाना महान येथील 25 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. तर शिवनगर भागातील जलकुंभातून आश्रय नगर भागातील जलकुंभाला पाणी पुरवठा केला जातो.
बुधवारी 1 फेब्रुवारी रोजी शिवनगर जलकुंभाच्या वितरण प्रणालीवरील व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने शिवनगर येथील दोन तसेच आश्रय नगर मधील एक अशा तीन जलकुंभातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता. तर दुसरीकडे व्हॉल्व दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्यात आले होते. व्हॉल्व दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण झाल्याने या तीन जलकुंभावरील पाणी पुरवठा पूर्वपदावर आला आहे.
शुक्रवारी या भागाला होईल पाणी पुरवठा
शिवनगर भागातील दोन जलकुंभातून वानखडे नगर, गुलजारपूरा, फडके नगर, खैर महंमद प्लॉट, नेहरु नगर झोपडपट्टी, गौसीया चौक, ज्ञानेश्वर नगर, फुकटपूरा आदी भागाला तर आश्रय नगर जलकुंभातून आश्रय नगर, मेहरे नगर, लक्ष्मी नगर, सरस्वती नगर, गुरुदत्त नगर, अंबिका नगर आदी भागाला शुक्रवारी पाणी पुरवठा होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.