आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपाने केला पाणी पुरवठा खंडीत:थकीत पाणीपट्टीचा भरणा न केल्याने सदनिकेचा पाणी पुरवठा केला खंडीत

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्तांना सिल लावले जात आहे. तर आता थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी पाणी पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. केवश नगर भागातील एका सदनिकेतील पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला.

महापालिका क्षेत्रात एकूण 72 हजार वैध नळधारक आहेत. यापैकी 60हजार नळधारकांना पाणीपट्टी देयक वितरीत करण्यात आले आहे. मात्र यापैकी केवळ 8 हजार 500 नळधारकांनी पाणीपट्टीचा भरणा केला. त्यामुळे चालु आर्थिक वर्षात अत्यल्प पाणीपट्टी वसुली झाली आहे. केवळ काही शासकीय कार्यालयांनी थकीत तसेच चालु आर्थिक वर्षातील पाणीपट्टीचा भरणा केल्याने यावर्षी पाच कोटी रुपयाची पाणीपट्टी वसुल झाली आहे. आर्थिक वर्ष संपुष्टात यायला केवळ दोन महिने राहिले आहेत. त्यामुळे आता थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत केशव नगर भागातील लोटस अपार्टमेन्टमध्ये 34 फ्लॅट धारक आहेत.

या फ्लॅटमध्ये दोन इंची नळजोडणी घेण्यात आलेली आहे. मात्र 2 लाख 72 हजार रुपयाच्या पाणीपट्टीचा भरणा अपार्टमेन्टने केला नाही. थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्याबाबत सुचना करुनही थकीत पाणीपट्टीचा भरणा न केल्याने या अपार्टमेन्टचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. ही कारवाई आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये तसेच पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी. ताठे यांच्या मार्गदर्शनात सुबोध वानखडे, अंकुश राठोड, निखिल नेहरे, मनोज खिल्लारे, मनीष बेलकर, शाम चतरकर, कंत्राटदार शेख फिरोज,संदीप तळेकर यांनी केली.

दरम्यान महापालिका प्रशासनाने 31 मार्च पर्यंत पुन्हा अभय योजना सुरु केली आहे. या अभय योजनेत अवैध नळजोडणी 400 रुपयात वैध केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडणी आहे. त्यांनी या योजने अंतर्गत आपली अवैध नळजोडणी वैध करुन घ्यावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...