आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने महापालिका मालमत्ता कर विभागाने महापालिकेच्या पूर्व आणि उत्तर झोन मध्ये दोन मालमत्तांना सिल लावले. दरम्यान थकीत कराचा भरणा नागरिकांनी करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेसमोर आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना १४३ कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. मालमत्ता कर वसुली हे मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असल्याने महापालिकेने थकीत तसेच चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
या अनुषंगाने मनपा पुर्व क्षेत्रातील जठार पेठ नवजीवन टेरेस येथील वार्ड क्रं. ए-३ मालमत्ता क्रं. ३००२ जसपालसिंह नागरा यांचे कडे सन २०१९-२० ते सन २०२२-२३ पर्यंतचा १ लाख ४ हजार ५५ रुपये कर थकीत होता. तसेच उत्तर क्षेत्रातील आकोट फैल, कागदीपुरा येथील वार्ड क्रं. सी-८ मालमत्ता क्रं. २४०२ इ.मा.तसद्दूख खां मो.खां भोगवटादार मो.उमर शेख दाउद यांचे कडे सन २०१७-१८ ते सन २०२२-२३ पर्यंतचा ६९ हजार ४७७ रुपये कर थकीत होता.
थकीत मालम्तता कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना करुनही थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने अखेर त्यांच्या मालमत्तेला सिल लावण्यात आले. ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, सहा.कर अधीक्षक हेमंत शेळवणे,पथक प्रमुख संगीता ठाकूर, सहा.कर अधीक्षक देवेंद्र भोजने,कर वसुली लिपीक राजेश साळुंखे, वासुदेव वानखडे, जितेंद्र रणपिसे, मनीष बोबडे ,श्रीकृष्ण वाकोडे,संजय सुर्यवंशी, यशवंत दुधांडे, देवनंद मेश्राम, गजानन मोरे, संतोष सुर्यवंशी, सुरक्षा रक्षक मो.सलीम, लता चोरपगार आदींनी केली.
थकीत मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारले जाते. त्यामुळे ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे. त्या नागरिकांनी आपल्या थकीत कराचा भरणा करुन जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.