आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलभूत सोयी सुविधांसाठी 9.63 कोटी रुपयाचा निधी मंजूर:डांबरीकरण, काँक्रीटीकरणासह विविध 60 विकास कामांचा समावेश

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाकडून महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांसाठी 7 कोटी 45 लाख आणि 2 कोटी 18 लाख असा एकूण 9 कोटी 63 लाख रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून विविध प्रभागात रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रीटीकरणासह विविध 60 विकास कामे केली जाणार आहेत. या कामांना येत्या काही दिवसात प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या कामांना प्रारंभ करण्यात येईल.

राज्याच्या नगरविकास विभागाने शहरात विविध विकास कामे करण्यासाठी हा निधी मंजुर केला आहे. या अनुषंगाने विविध प्रभागात विविध विकास कामे घेतली आहेत. प्रभाग क्रमांक 2,प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 20 मध्ये ही विकास कामे केली जाणार आहेत. यात या सर्व भागात 22 विविध रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार असून एकूण 23 रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे तर एका रस्त्याचा खडीकरण तसेच 6 नाल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. यामुळे विविध प्रभागात येत्या काही दिवसात विकास कामे होणार आहेत. प्रशासकीय मंजुरी नंतर या कामांना प्रारंभ करण्यात येईल.

यापूर्वी शहराच्या विविध प्रभागात विविध विकास कामे करण्यासाठी 15 कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. त्यामुळे शहरात एकूण 24 कोटी 63 लाख रुपयाची विकास कामे होणार असून याचा फायदा माजी नगरसेवकांना निवडणुकांमध्ये होवु शकतो.

अन्य कामांचाही समावेश

रस्त्याचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण, नाल्याच्या बांधकामा सोबतच संत तुकाराम चौकाचे राहिलेले काँक्रीटीकरण, शिवाजी पार्कचे सौंदर्यीकरण, शिवसेना वसाहतीत सामाजिक सभागृह आणि महात्मा फुले नगर भागात सभागृहाचे बांधकाम केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...