आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक लाभार्थ्यांनी घरकुलासाठी तीन ते चार वर्षापासून प्रस्ताव दाखल केला पण विविध कारणांमुळे घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला नाही. शुक्रवारी आयोजित घरकुल मेळाव्यात आलेल्या अनेक महिला लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आम्हाला घरकुलाचे पैसे द्या हो, असे आर्जव केले. कारण कागदपत्रांची पूर्तता न केल्यास मंजुर झालेले घरकुल रद्द केले जाणार आहे. त्यामुळे यावेळी अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यात आपल्या हक्काच्या घरकुलासाठी डोळ्यात अश्रू आज तरळले.
पैशांचा केला भरणा
आर्जव स्वर ऐकून नगररचना विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्येक लाभार्थ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही बाबूी जाणून घेत लाभार्थ्यांनी गुंठेवारी नियमानुकुलच्या पैशाचा भरणा केला.
पीएम आवास, लाभार्थ्यांसाठी मेळावा
विविध कारणांनी रखडलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवारी दि.३ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या मेळाव्यात पंतप्रधान आवास योजनेत घरकुल मंजुर झालेल्या शेकडो लाभार्थ्यांनी अत्यावश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घेतली. तर अनेकांनी गुंठेवारी नियमानुुकुलचे पैसे भरले. हा मेळावा शनिवारी दि.४ फेब्रुवारी रोजी देखील सुरु राहणार आहे.
तर रद्द होणार घरकुल!
विविध कारणांनी घरकुलाचे काम सुरु न झाल्याने लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. ही कागदपत्रे सादर न केल्यास लाभार्थ्यांचे मंजूर घरकुल रद्द केले जाणार आहे. या अनुषंगाने लाभार्थ्यांना अखेरची संधी देण्यासाठी आवास योजना कक्षाच्या वतीने शुक्रवार आणि शनिवारी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शुक्रवारी शेकडो लाभार्थ्यांनी गर्दी केली.
किती घरकुल पात्र, किती अपात्र!
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ७ हजार ६४० घरकुले मंजुर झाली होती. यापैकी विविध त्रुट्यांमुळे ९७२ घरकुले अपात्र ठरली. तर १ हजार ९२७ घरकुलांची कामे सुरु आहेत. तर यापूर्वी २ हजार ५०० घरकुले मंजुर झालेली आहेत.
मंजुर लाभार्थ्यांमध्ये गुंठेवारी पद्धतीच्या लाभधारकांचाही समावेश आहे. गुंठेवारी लाभधारकांचे प्लॉटचे नियमानुकुल झाले. त्यामुळे बांधकामाचा नकाशा मंजूरीचा मार्ग मोकळा झाला. मात्र विविध कारणांनी अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचा नकाशा मंजुरीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नगररचना विभागात दखल केलेली नाहीत. या अनुषंगानेच हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
आयुक्तांनी घेतली परिक्षा
सकाळी दहा वाजता महापालिकेच्या सभागृहात मेळाव्याच्या अनुषंगाने विविध टेबल लावण्यात आले होते. या टेबलवरील अधिकारी-कर्मचाऱ्या समोर आयुक्त कविता द्विवेदी यांनी स्वत: जावून मी लाभार्थी आहे. मला माझ्या घरकुलाबाबतची अडचण सांगा? असा प्रश्न विचारुन परीक्षा घेतली. मात्र आयुक्तांना या संदर्भात प्रश्न विचारण्याची हिंमत कर्मचाऱ्यांची झाली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.