आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्या आईचाच केला विश्वासघात:मुलासह बँक व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; अकोल्यातील धक्कादायक घटना

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटच्या मुलाने फसवणूक केल्याने आता आपल्याला स्वत:चे घर व मालमत्ता खाली करावी लागत आहे, अशी तक्रार एका आईने आपल्या मुलाविरुद्ध केली. त्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मुलगा आणि एका बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

विना सुरेश ढवळे यांनी तक्रारीत म्हटले की, पती वारल्यानंतर आपला दुसरा मुलगा पुष्कर याच्याविरुद्ध खोटी प्रकरणे आरोपी मुलगा समीर ढवळे व त्यांची पत्नी यांनी केला होता. पती आणि मुलगा समीर यांची भागीदारी संस्था असलेल्या मे. ढवळे ऑटोमोबाइल्समध्ये समीर हा बेकायदेशीर कारभार पाहत होता. परंतु जेव्हा बँक आपल्याकडे नोटीस घेऊन आले तेव्हा आपण खात्याची तपासणी करताना नुकतीच आपल्याला सदर बेकायदेशीर रक्कम वळती करून गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा मुलगा समीर याने कटकारस्थान रचून केल्याचे लक्षात आल्याने आपल्याला धक्का बसला.

समीर हा सुरुवातीपासूनच माझे व माझ्या पतीचे स्थावर जंगम संपत्तीवर डोळा ठेऊन होता व त्या लालसेतून तो आपल्याला व माझ्या पतीला तसेच माझा दुसरा मुलगा पुष्कर यास ऐनकेन प्रकारे त्रास देत होता. यावरून सदर रक्कम ही गिळंकृत करण्याच्या उद्देशाने आरोपी समीर व आरोपी व्यवस्थापक यांनी बेकायदेशीरपणे वळती करून वर उल्लेखीत केल्याप्रमाणे नुकसान पोहचवले आहे. समीर व बँक व्यवस्थापक तुषार पराटे यांनी संगनमताने केलेल्या पैशांची अफरातफ आणि फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर आपण पोलिसांत धाव घेतली. मुलगा समीरने आपले पती यांची फयवणूक केली आहे.

समीरने संगनमताने मे. ढवळे ऑटोमोबाइल्स या संस्थेच्या नावाने असलेल्या अॅक्सीस बँकेच्या कर्जखात्यातून 80 लाख 50 हजार काढून घेतले आणि त्याची परतफेड केली नाही. अ‍ॅक्सीस बँक ही माझ्याकडून मे ढवळे ऑटोमोबाइल्स या संस्थेच्या थकीत झालेल्या कर्जाच्या रकमेची वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण वयोवृद्ध असून विधवा आहे. मुलगा समीर याने संगनमताने आणि पूर्वतयारीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला मिळत आहे. माझे स्वताचे घर व इतर मालमत्ता मला खाली करावी लागणार आहे. मयत पती सुरेश ढवळे यांची व माझी आर्थीक फसवणूक मुलगा समीर याने केलेली आहे. भागीदारी संस्थेच्या कर्ज खात्यातील रक्कम आरोपी मुलगा समीर याने परस्पर काढून आरोपी व्यवस्थापक याने त्यास सहकार्य केले आहे. पती यांनी सदर भागीदारी संस्था संपुष्टात आणूनही आरोपींनी चुकीचा व्यवहार केला आहे. अशा तक्रारीवरून मुलगा समीर ढवळे व यांच्याविरुद्ध भादंविचे कलम 406,409,420 नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या तक्रारीत त्यांनी आपल्या सुनेवरही गंभीर आरोप केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...