आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका प्रशासनाने शिक्षक पतसंस्थेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यात शिक्षकांसह पाच जणांना बडतर्फ केले होते. याबाबत बडतर्फ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागीतली. या अनुषंगाने नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाला या बडतर्फ कर्मचाऱ्यांबाबत अहवाल मागीतला आहे.
महापालिका शिक्षक पतसंस्थेत आर्थिक घोटाळा झाला होता. ही पतसंस्था महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत नव्हती. तसेच या पतसंस्थेचा कारभारही महापालिका प्रशासनाच्या हाती नव्हता.
आर्थिक घोटाळ्या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशी करण्यात आली. या अनुषंगाने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या आर्थिक घोटाळ्याच्या चौैकशीचे काम सुरु होते. मात्र या दरम्यान महापालिका प्रशासनाने किशोर सोनोने, नरेश मूर्ती, शरद ताले, प्रकाश फुलउंबरकर, सुनिता चरकोल यांना या प्रकरणात बडतर्फ करण्यात आले होते.
दरम्यान बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने विधान सभेच्या आधिवेशना दरम्यान 19 डिसेंबर 2023 रोजी विधान सभेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेवून बडतर्फीची कारवाई मागे घेण्याची मागणी केली होती. आता विधान सभेचे अधिवेशन संपल्या नंतर नगरविकास विभागाने या पाच बडतर्फ कर्मचाऱ्यांबाबतचा अहवाल प्रशासनाला मागीतला आहे. प्रशासनाच्या अहवाला नंतर नगरविकास विभाग महापालिकेला कोणते आदेश देणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अहवालाबाबत उत्सुकता
पतसंस्थेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा आणि महापालिका प्रशासनाचा थेट संबंध नव्हता. या प्रकारामुळे केवळ महापालिकेची बदनामी झाली, या कारणाने या कर्मचाऱ्यांना निलंबीत न करता थेट बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे महापालिका प्रशासन अहवालात नेमके काय नमुद करणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.