आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विनामास्क प्रवाशांना ऑटोचालकांनी आपल्या रिक्षामध्ये बसू देऊ नये यासाठी राज्यभर ‘नो मास्क नो सवारी’ उपक्रम राबवला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत सूचना दिल्या आहेत. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सगळ्याच शहरात मोठी आहे. मास्क वापरणे कोरोनाचा प्रसार राेखण्यासाठी महत्वाचे आहे मात्र अनेक ठिकाणी नागरिक मास्क वापराबाबत अजूनही सजग नाहीत.
मास्क नसलेले प्रवासी रिक्षात बसून तिथून कोरोनाची साखळी तयार होते म्हणून अकोल्यात ‘नो मास्क, नो सवारी’ हा उपक्रम रिक्षाचालकांसाठी राबवला गेला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन राज्यभर हा अकोला पॅटर्न राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीडसह इतर ठिकाणी याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरु केली गेली आहे.
२ हजार रिक्षांवर पोस्टर
अकोल्यात कोरोना रुग्णांची मोठी संख्या होती, अनलॉकमध्ये प्रवासी वाहतूक सुरु झाल्यानंतर रिक्षा चालकांच्या मदतीने मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना रिक्षात बसू न देण्याचा निर्णय घेतला. नो मास्क नो सवारी असे नाव दिले. २ हजारांहून अधिक रिक्षांवर पोस्टर चिटकवून जागृती केली गेली होती. - जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, अकोला
काय आहे अकोला पॅटर्न? :
एखादा विनामास्क प्रवासी ऑटोमध्ये बसला आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्यापासून चालक संक्रमित होऊ शकतो, ऑटोही दूषित होऊन पुन्हा ही साखळी शेकडो प्रवाशांपर्यंत जाऊन मोठी साखळी तयार होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन अकोला पोलिस दलाने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून वाहतूक शाखेद्वारे रिक्षाचालकांसाठी नो मास्क नाे सवारी उपक्रम राबवला. हा उपक्रम प्रभावी ठरला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.