आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:जेसीबीने दुचाकीला उडवले;‎ मुलाचा मृत्यू, आई जखमी, अकोला-पातूर रोडवरील घटना

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला ते पातूर रस्त्यावर माऊली बार‎ समोर जेसीबीने दुचाकीला धडक दिली.‎ यामध्ये दुचाकीस्वार मुलाचा मृत्यू झाला तर ‎आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ‎मंगळवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान‎ घडली.‎ या संदर्भात मिळालेल्या ‎माहितीनुसारओमराज शिवहरी गावंडे‎ (वय २६) रा. देऊळगाव असे अपघातात‎ मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे तर‎ रुक्मिणीबाई शिवहरी गावंडे असे त्याच्या ‎जखमी झालेल्या आईचे नाव आहे.

कसा झाला अपघात?

हे दोघे मायलेक दुचाकीने देऊळगाव येथे जात होते. ‎दरम्यान समोरून आलेल्या जेसीबीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या धडकेत दोघेही ‎मायलेक गंभीर जखमी झाले होते. या ‎अपघातात दुचाकीचा अक्षरक्ष: चुराडा झाला‎ होता.‎ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पातूर‎ पोलिस स्टेशनचे रमाकांत केकन, पत्रकार‎ दुलेखान युसुफ खान, निशांत गवई, प्रमोद‎ कढोणे यांनी घटनास्थळ गाठले होते. या‎ वेळी त्यांना एक युवक आणि महिला गंभीर‎ अवस्थेत पडून दिसले.‎

दरम्यान दोघांनाही रूग्णालयात दाखल‎ केले असता डॉक्टरांनी ओमराज गावंडे‎ याला मृत घोषित केले. अकोला ते पातूर हा‎ रस्ता चौपदरी झाला असून, देखील जेसीबी‎ चालकाने विरूद्ध दिशेने निष्काळजीपणाने‎ वाहन चालवल्याने समोरून येणाऱ्या‎ दुचाकीस्वारास उडवून दिल्याने अपघात‎ झाला व युवकाचा मृत्यू झाला. या घटनेला‎ जेसीबी चालक जबाबदार असल्याचा आरोप‎ देऊळगाव येथील ग्रामस्थांनी केला असून,‎ त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली‎ आहे.‎