आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2 जानेवारीपासून अकोल्यात 366 पोलिस शिपाई पदासाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. ही पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी परीक्षा पोलिस मुख्यालय आणि वसंत देसाई स्टेडिअमवर होत आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवल्या जात असली तरी माध्यमांना मात्र चार हात दूर ठेवत पारदर्शतेचा दावा केला आहे.
यापूर्वी अकोला जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. कोरोना संक्रमणापूर्वी चंद्रकिशोर मिना पोलिस अधीक्षक असताना त्यांनी जी भरती प्रक्रिया राबवली त्यानंतर ही पहिलीच भरती आहे. त्यावेळी पोलिस भरती संदर्भातील प्रत्येक बाबी पारदर्शकपणे माध्यमांपर्यत पोहचवल्या जात होती. तसेच मैदानी चाचण्या व लेखी परीक्षा आणि त्याचे वेळापत्रकही वेळेवर फ्लॅश होत होते. तशी माहितीही माध्यमांपर्यंत पोहचवण्याची यंत्रणा होती.
माध्यमांना दूर ठेवले
सध्या सुरु असलेली पोलिस भरती ही वसंत देसाई स्टेडिअमवर आहे. संपूर्ण स्टेडिअमवर चहुबाजुंनी पडदे लावण्यात आले आहेत. आत काय सुरु आहे हे केवळ भरती प्रक्रिया राबवणाऱ्यांच ठाऊक असून माध्यमांना दूर ठेवण्यात आले आहे. तसेच भरती प्रक्रियेच्या संदर्भात किती उमेदवार पात्र ठरले किती अपात्र यासंदर्भात कोणतीही खबर माध्यमांना होऊ न देणे यातच पोलिस प्रशासन धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. तर नेमके पारदर्शकता कशा पद्धतीने राबवल्या जात आहे हे पोलिसांनाच ठाऊक आहे.
पत्रकारांशी बोलणे टाळले
दुपारी 2 वाजता पोलिस प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी ती रद्द करण्यात आली आणि भरती प्रक्रियेच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत न घेता कोणतीही माहिती माध्यमांना पुरवण्यात आली नाही. त्यानंतर केवळ भरती पारदर्शक सुरु असल्याची प्रेसनोटमात्र देण्यात आली. पत्रकारांशी बोलणे का टाळले याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
गोपनीय यंत्रणा कार्यान्वीत
पोलिस निरीक्षक म्हणाले, पोलिस दलातर्फे सुरू असलेली भरती प्रक्रिया नि:पक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे होत असून, दलालापासून सावध राहावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्याकरीता 25 पोलिस अधिकारी व 250 पोलिस अंमलदार यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. साध्या गणवेशातील गोपनीय यंत्रणा देखील कार्यान्वीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.