आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला पोलिसांनी धडक कारवाई:कुख्यात आरोपींला बुलडाणा ते अमरावती पाठलाग करत घेतले ताब्यात; अनेक गुन्ह्यातील आहे आरोपी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल आरोपीचा पाठलाग केला आरोपी अमरावती जिल्ह्यात घुसला जेव्हा आरोपीला कळून चुकले की पोलिस आपल्याला पकडतात त्यानंतर त्याने लगेच पोलिसांवर रिव्हॉल्व्हर रोखली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा तो कार मध्ये बसून पळाला.

अखेर पोलिसांनी त्याच्या कारच्या चाकावर गोळ्या झाडल्या. गाडी पंचर झाल्यानंतर अनियंत्रित झाली व इलेट्रीक पोलला धडकली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत त्याला पकडले. आरोपीवर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही घटना अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनगरात घडली आहे. पकडण्यात आलेला आरोपी हा अकोला येथील असून त्याचे नाव राजेश सुभाष राऊत असे आहे.

राजेश सुभाष राऊत हा अकोला येथून पळत अमरावतीत आला त्याचा पाठलाग अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते, दरम्यान अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनगरात पोलिस त्याला पकडत असतांना त्याने थेट पोलिसावर रिव्हॉल्व्हर रोखली व तो पळून जात होता दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या गाडीच्या टायरवर गोळीबार केला त्यामुळे आरोपीची चार चाकी अनियंत्रित झाली व गाडी थेट एका इलेट्रीक पोलला धडकली, त्यामुळे पोलिसांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेऊन गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये आणले आहे.

आरोपी राजेश सुभाष राऊत मूळ रहिवासी अकोला गजानन नगर जुना अकोला आरोपीचा पाठलाग अकोला गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी करीत होते बुलडाण्यापासून आरोपीचा पाठलाग सतत अमरावती लक्ष्मी नगर पर्यंत पाठलाग केला, अकोला गुन्हा शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना आरोपी राऊतला पकडण्यात यशस्वी झाले, पुढील तपास अकोला पोलिस व अमरावती गाडगे नगर हद्दीमध्ये झाल्यामुळे गाडगे नगर पोलिस घटनेचा पूर्ण तपास करीत आहे, आरोपीवर अकोला व अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीही अकोला पोलिस त्याच्या मागावर असताना पोलिसांसोबत त्याची झटापट झाली होती. अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

घरफोड्यांच्या अनेक गुन्ह्यात सहभाग

घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीने पोलिसांना जेरीस आणले होते. अनेक घरफोड्यांच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता.

बातम्या आणखी आहेत...