आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील निमवाडी भागातील पोलिस वसाहतीकडे 1 कोटी 12 लाख रुपयाची पाणीपट्टी थकीत आहे. एवढ्या रकमेच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसल्याने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
महापालिकेच्या अकोला पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून नागरिकांप्रमाणे विविध शासकीय कार्यालये, वसाहतींनाही पाणी पुरवठा केला जातो. या वसाहतींना स्वतंत्रपणे पाणी पुरवठा केला जातो. परिणामी अशा वसाहतींना अधिक मिलीमिटर व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा होत असल्याने त्यांना पाणीपट्टीचे दरही अधिक लागतात. पोलिस विभागाची निमवाडी परिसरात वसाहत आहे. या वसाहतीत एकूण 378 निवासस्थाने आहेत. या निवासस्थांना 200 मिली मिटर व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा केला जातो. वसाहतीने सप्टेंबर 2019 पासून पाणीपट्टीचा भरणा न केल्याने या पोलिस वसाहतीकडे 1 कोटी 12 लाख रुपयाची पाणीपट्टी थकली आहे. आता या पाणीपट्टीचा भरणा करण्यासाठी महापालिकेने पोलिस प्रशासनाकडे तगादा लावला आहे.
दरम्यान थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्याबाबत पोलिस प्रशासनाला पत्र दिल्या नंतर पोलिस प्रशासनाने दर दोन महिन्याच्या पाणीपट्टीचे देयक द्यावे, असे ठरले असताना ते देयक न दिल्याने पाणीपट्टी थकली तसेच एवढ्या रकमेचा धनादेश काढण्याचे अधिकार नसल्याने एक रकमी पाणीपट्टीचा भरणा करता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता यातून मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. रखडलेली पाणीपट्टीचे दर दोन महिन्याचे देयक तयार करुन ते पोलिस प्रशासनाला सादर केले जाणार आहे. त्यानंतर ही थकीत पाणीपट्टी वसुल होण्याचा मार्ग मोकळा होवू शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.