आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोट शहरातील शौकत अली चौकाजवळ लूडो जुगारावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून 12 अरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला. तर ३ मोटरसायकल (किंमत 1 लाख 20 हजार रुपये), 10 मोबाईल (किंमत 46 हजार), नगदी 46 हजार असा एकूण २ लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाला शनिवारी, 18 जूनला खात्रीशिर माहिती मिळाली होती की, अकोट शहरामधील शौकत अली चौकासमोरील कमल टॉवर पार्किंगच्या बाजूला काही लोक लूडो जुगारावर पैसे लावून खेळत होते. या खात्रीशीर माहितीवरून दोन पंचासमक्ष छापा मारला असता 12 आरोपींजवळून 3 मोटारसायकल, 10 मोबाईल व रोख रक्कम असा 2 लाखांच्यावर किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये अब्दुल जावेद अब्दुल रशीद, सय्यद अजहर सय्यद अब्बास, अब्दुल जुबेर अब्दुल साबिर, अक्रम शाह अनवर शाह, शेख अख्तर शेख अयूब, मोहमद इब्राहिम मो. इमानुलहक, इरफान अली लियाकत अली, मो. वासिद मो. मुझफ्फर, रहमत अली यूनुस अली, रियाज अहमद शेख नूरा, अब्दुल जाकिर अब्दुल जलील, अब्दुल आरिफ अब्दुल कुद्दुस अशा आरोपितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 ऐ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने शनिवारी सायंकाळी 7 वाजता शौकत अली चौकात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.